सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा- दायक बातमी आहे. कारण आता विद्युत वितरण कंपनी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कुठलेही रोहित्र जळाल्यानंतर अधिकाऱ्यांना हात जोडून कामासाठी चिरीमिरी देण्याऐवजी थेट संपर्क साधा. यासाठी विशेष नियंत्रण कक्षात फोन कॉल सुविधा सुरू करण्यात आलीय.
रब्बी हंगामात शेती सिंचनासाठी असलेले विद्युत रोहित्र अतिरिक्त विद्युत पुरवठ्याच्या मागणी व अतिभारामुळे जळतात. शेतीपंपाच्या वीज मागणीत जशी वाढ होते तसा महावितरणच्या वीज यंत्रणेवर ताण येतो. रोहित्र तातडीने बदलता यावे यासाठी शेतकऱ्यांनी रोहित्र नादुरुस्त होताच कंपनीच्या कंट्रोल रुमला फोन करावे असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
बारामती परिमंडल कार्यालयांतर्गत महावितरणची सातारा, सोलापूर व बारामती असे तीन मंडल कार्यालये आहेत.गतकाळात रोहित्र जळाल्यानंतर शेतकरी स्थानिक वितरण कंपनीच्या कार्यालयात खेट्या घालू लागतात. आणि हीच संधी साधून धूर्त अधिकारी शेतकऱ्यांना रोहित बदलण्यासाठी खूप वेळ लागेल. पूर्वीची कामे पेंडिंग आहेत. मागणी मोठी आहे पूर्तता होत नाही. ट्रांसफार्मर शिल्लकच नाही अशी असंख्य कारणे देतात. यावेळी शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर असल्याने नाविलाज म्हणून शेतकरी अधिकाऱ्यांशी आर्थिक तडजोड करण्याचा निर्णय घेत असे. यासाठी अनेकदा लाभार्थी शेतकऱ्यांकडून लोकवर्गणी गोळा करून अधिकाऱ्यांची तुंबडी भरली होती.
परंतु नवीन विद्युत वितरण कंपनीच्या धोरणामुळे आता अधिकाऱ्यांची मेहरबानी ची गरज पडणार नाही. जळालेले रोहित्र तातडीने बदण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असून, रोहीत्र जळताच शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या दैनंदिन नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रुम) फोन करावा. जेणेकरुन संबंधित रोहित्र तातडीने बदलणे शक्य होईल. नियंत्रण कक्षाचे क्रमांक सोलापूरसाठी ९०२९१४०४५५, सातारा ९०२९१६८५५४ व बारामती करिता ७८७५७६८०७४ असे आहेत. या क्रमांकावर शेतकऱ्यांनी फोन केल्यास रोहित्र बदण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जातील.