सुपे परगणा ! सचिन पवार ! अंधाराचा फायदा घेत जेजुरीत चोरलेला टॅक्टर घेऊन चोर सुसाट : वडगाव निंबाळकर पोलीसांचा सिनेस्टाईल पाठलाग, मुद्देमाल हस्तगत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : सचिन पवार
गोपीनीय माहितीच्या आधारे वडगाव निंबाळकरचे दबंग पोलीस अधिकांऱ्यांनी अगदी तत्परतेने सिने स्टईलने पाठलाग करित चोरीची ट्रॅक्टर-ट्रॉली पकडण्यात आली आहे,
           वडगाव निंबाळकर पोलीसांना अचानक गोपीनीय माहितीद्वारे सुचना आली की जेजुरी हद्दीतून चोरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊन एक संशयित इसम सुपा मार्गे येत आहे, यावेळी आपल्या कामाकाजावर तत्पर असणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक सलिम शेख व उपनिरिक्षक शेलार यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेता आपल्या सहकार्याना ताबोडतोफ दिलेल्या माहीतीच्या घटनेची दिशेने वाटचाल केली , यावेळी पो ना देशमाने ,हवालदार खेडकर ,पो शी नाळे ,चालक पो ना शेंडकर यां सर्वानी संशयित ट्रॉली व ट्रॅक्टर यांचा अचुक अंदाज व शहानिशा करत पाठलाग  केला असता संशयित आरोपी ट्रॅक्टर सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.पंरतु यावेळी सदरचा ट्रॅक्टर व ट्रॉली माहिती घेतली असता तो जेजुरी हद्दीतून 5/2/22 रोजी चोरी झाल्याचे व जेजुरी येथे गुन्हा दाखल असलेबाबत माहिती मिळाळी व तो मुद्देमाल तपासाअंती जेजुरी पोलीस स्टेशन कडील पो ना नांदे यांचे ताब्यात देण्यात आला,
To Top