पुरंदर ! ग्रामपंचायतीची परवानगी नसताना शासकीय परवानग्या कशा ? ग्रामपंचायत प्रशासन म्हणतंय..... खडीमशीनला कोणत्याही लेखी परवानगी दिली नव्हती खडीमशीन प्रकरण (भाग ३)

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी 
    मागील काळात कर्नलवाडी ग्रामपंचायतीने खडिमशीन विरोधात ग्रामसभेत ठराव केला होता. तर गुळूंचे ग्रामपंचायतीने सोमेश्वरचे संचालक शैलेंद्र रासकर यांच्या खडीमशीनला कोणत्याही लेखी परवानगी दिली नव्हती तरही कायद्याच्या पळवाटा काढत खडीमशीनसाठी शासकीय परवानग्या कशा काढल्या याबाबत गुळूंचे कर्नलवाडी ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 
           वास्तविक ग्रामपंचायतीला एखाद्या उद्योगाची परवानगी मागीतल्यास ती तीन महिन्यात न दिल्यास प्रशासकीय परवानगी मिळते. पण धोकेदायक व पर्यावरणाला हानीकारक असलेले प्रकल्पांना ग्रामस्थांना अंधारात ठेवून कशी परवानगी दिले जाते असा प्रश्न उपस्थित होत आहे. रासकर यांनी पंचायत समिती, प्रदुषण नियंत्रन मंडळ आदिंच्या परवानग्या घेतल्या तसेच अवैध माध्यमातून खडीमशीनला वीज कनेक्शन ही घेतले आहे. ग्रामपंचायतींचा एकही कागद नसताना अशा परवानग्या कशा दिल्या गेल्या असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. प्रशासकीय पातळीवर जर अशा परवानग्या मिळत असतील यात काही अर्थपूर्ण व्यवहार झाला असण्याची दाट शक्यता नकारता येत नसल्याची ही चर्चा ग्रामस्थ करत आहेत. 
        गुळूंचे नजीकच्या राख गाव व बारामती तालुक्याच्या हद्दीतील खडीमशीचा मालाची रात्री अपरात्री वाहतूक केली जात आहे. ही खडी वाहतूक करणारी अवजड वाहने गुळूंचे कर्नलवाडी गावअंतर्गत छोट्या रसत्यावरुन वेगात दामटली जातात. त्यामुळे अंतर्गत रस्ते खचून धोका संभावत आहे. या कारणाने अशी अवजड व धोकेदायक वाहतूक या दोन्ही गावांतून होऊ नये अशी मागणी आता खडीमशीन विरोधा निमित्ताने होत आहे. तसे ठराव ग्रामपंचायतीत मांडून मंजूर करण्यात येत आहेत. या ठरावाच्या प्रती महसूल विभागांसह आरटीओ व पोलीस विभागालाही देण्याच्या सुचना युवकांनी केल्या 
          मागील काळात कर्नलवाडी ग्रामपंचायतीने खडिमशीन विरोधात ग्रामसभेत ठराव केला होता. तरीही परगावातील व काही स्थानिकांनी खडिमशीनची परवानगी मागितली होती. यामध्ये चंद्रशेखर माने, दिपक जगताप, निर्मला कदम, स्मिता निगडे यांचे अर्ज आले होते. हे अर्ज नुक्त्याच झालेल्या ग्रामसभेत निकाली काढण्याची सुचना ग्रामस्थांनी केली. त्यामुळे या सर्वांना परवाणगी नकारत असल्याचे ग्रामसेवक जयंद्र सुळ यांनी सांगितले.  या निर्णयाचे ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. 
--------------------------
शासनाचे सर्व निकष पाळून ही खडीमशिन उभी राहणार आहे. मंदिर हे आमचेही श्रद्धास्थान असून मंदिर आणि क्रशर यामध्ये नियमानुसार अंतर ठेवले गेले असून यामुळे मंदिराला कोणताही धोका नाही, जर झाल्यास ती माझी जबाबदारी राहील. आसपास च्या कोणत्याही शेतकऱ्याला याचा त्रास होणार नसून गावातील सर्व ग्रामस्थ मला आदरणीय आहेत. हे क्रशर उभे करताना फोवर सिस्टीम तसेच बांबूंची झाडे लावणार आहोत. 
शैलेश रासकर
संचालक सोमेश्वर कारखाना
To Top