बारामती ! वाणेवाडीकरांनो सावधान....कर भरा अन्यथा तुमच्या नावाचे फ्लेक्स चौकात लागणार : सरपंच गितांजली जगताप यांनी पदभार स्वीकारताच घेतला मोठा निर्णय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी ग्रामपंचायतची घरपट्टी व पाणीपट्टी कर तब्बल ५० लाखांचा आसपास थकबाकी असून याबाबत वाणेवाडीच्या ६०० ग्रामस्थांना वसुलीबाबत नोटीसा पाठवल्या आहेत. जर ग्रामस्थांची वेळेत ही थकबाकी भरली नाही तर थकबाकी न भरणाऱ्या लोकांची नावे चौकात फ्लेक्सवर छापण्यात येतील असे वाणेवाडीच्या सरपंच गितांजली दिग्विजय जगताप यांनी सांगितले. 
           नुकत्याच पार पडलेल्या २६ जानेवारीच्या ग्रामसभेत कर वसुलीबाबत चर्चा होऊन थकबाकीदारांना नोटीसा पाठवण्याचे ठरले त्यानुसार ग्रामपंचायतने ज्या खातेदारांची पाच हजारांच्या वर थकबाकी आहे.अशा ५० लाख रुपयांच्या आसपास थकबाकी असलेल्या तब्बल ६०० लोकांना नोटीसा पाठवलेल्या आहेत. 
          पुढे बोलताना गितांजली जगताप म्हणाल्या, १ एप्रिल पासून नियमानुसार करामध्ये वाढ होणार असून २०११-२०१२ साली झालेल्या सर्वेक्षणावर कर आकारणी केली जात आहे. त्यामुळे नवीन फेर सर्वेक्षण केले जाणार असून त्यानुसार कराची आकारणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपल्या गावात २२ कोटी रुपयांची फिल्टर पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून लवकरच सर्व वार्ड मधील लोकांना स्वच्छ पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे गितांजली जगताप यांनी सांगितले.
To Top