सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील गुळुंचे-कर्नलवाडी भागातील अतिवृष्टी चे बोगस पंचनामे केल्या प्रकरणी पुरंदरच्या तहसीलदार यांच्याकडे योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे.
गुळुंचे / कर्नलवाडी येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे बोगस केल्या प्रकरणी दि १४ ऑक्टोबर २२ रोजी पुरंदर चे आमदार संजय जगताप यांच्याकडे लेखी निवेदन गुळुंचे /कर्नलवाडी ग्रामस्थांनी दिले होते. त्यावर आ. जगताप यांनी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देखील संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गास दिल्या होत्या. परंतु त्या ठिकाणी कोणतीही कार्यवाही न करता मनमानी कारभार करून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. गुळुंचे/कर्नलवाडी येथील तलाठी गणेश महाजन ,ग्रामसेवक जयेंद्र सूळ व कृषी सहाय्यक सौ. नेवसे ह्याच्या मनमानी मुळे शेतकरी अडचणीत जाण्याची शक्यता आहे. असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पीक नुकसानीची पाहणी करताना योग्य नुकसानाची नोंद घेणे गरजेचे असताना कुठे १० गुंठे तर कुठे ३ ते ४ हेक्टर अशी भेदभाव जनक नोंद केली गेली आहे. मग पंचनामे करताना नक्की कोणता निकष लावला ? शासनाचे निकष धाब्यावर बसवून नक्की कुणाचे खिसे भरण्यासाठी चुकीचे पंचनामे केले हे नक्की कळून येत नाही गरीब शेतकरी यामध्ये भरडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पण मर्जितल्या बागायतदारांची मात्र चंगळ होताना नक्की दिसून येईल.
याबाबत गुळुंचे येथील अक्षय निगडे यांनी पंचनाम्याची यादीची मागणी संबंधित तलाठी,कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्या कडे केली असता त्यांनी ती देण्यास नकार दिला त्यामुळे निगडे यांनी पुरंदरच्या तहसीलदार यांच्याकडे मागणी केली व ती त्यांना मिळाली देखील परंतु त्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेले धक्कादायक आकडे समोर आले आहेत ती यादी पाहता काही शेतकऱ्यांना शुन्य तर काहींना लाखो रुपयांची नुकसान भरपाई मिळणार असल्याचे दिसून येत आहे. या संबंधी पुरंदर तहसीलदार ,कृषिविभाग, तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असल्याचे अक्षय निगडे यांनी सांगितले.
------------------
संबंधित कर्मचाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या सर्व्हे कामात हलगर्जीपणा केला व शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवल्याचा ठपका ठेवत नैसर्गिक आपत्ती अधिनियम २००५ च्या कलम ५२, कलम५६ अन्वये कार्यवाही करण्यात यावी त्याच बरोबर म.ना.से (शिस्त व अपील) कायदा १९७९ अन्वये कार्यवाही करून संबधित पिकांचे नुकसान भरपाई चे पंचनामे योग्य रितीने करून योग्य ती भरपाई देण्यात यावी तसेच पिकांचे व फळवागांचे पंचनामे दुरुस्ती करून पारदर्शकपणे यादी तयार करावी
अक्षय निगडे
उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा
COMMENTS