भोर ! संतोष म्हस्के ! हिर्डोस मावळात काँग्रेसच्या ताकतीत भर : भावेखलच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हीर्डोस मावळ खोऱ्यातील भावेखल ता.भोर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम थोपटे यांचा तालुक्यातील विकास कामांचा धडाका व कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने हिर्डोस मावळात काँग्रेसच्या ताकतीत मोठी भर पडली आहे.
              भावेखल येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार संग्राम थोपटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राजगड ज्ञानपीठाच्या सचिवा स्वरूपात थोपटे, माजी सभापती बाळासाहेब थोपटे, महिला तालुकाध्यक्ष गीतांजली शेटे,माजी पंचायत समिती सदस्य सुवर्णा मळेकर, युवा उद्योजक अनिल सावले ,माजी जिल्हा परिषद सदस्य गीतांजली आंबवले,खरेदी विक्री संघाचे चेअरमन अतुल किंद्रे,लक्ष्मण पारठे,सुभाष कोंढाळकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
To Top