बारामती ! मु. सा. काकडे महाविद्यालयात 'राष्ट्रीय एकात्मता' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी “राष्ट्रीय एकात्मता” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले.
            महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. जवाहर चौधरी व प्रा. अच्युत शिंदे उपस्थित होते. एकात्मता ही राष्ट्राची शक्ति आहे म्हणून तिच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूंनी विचार करणे गरजेचे आहे असे मत डॉ. जगन्नाथ साळवे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये मांडले. 
कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये डॉ. जवाहर चौधरी यांनी “राष्ट्रीय एकात्मता: काळाची गरज” या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय एकात्मतेसाठी युवकांमध्ये तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता असणे गरजेचे आहे हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना पटवून दिले. तर कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये “राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. अच्युत शिंदे यांनी असे मत व्यक्त केले की, मानवी शरीरामध्ये जसे ऑक्सीजन हा प्राणवायू अत्यंत महत्वाचा आहे, त्याचप्रमाणे एकात्मता हे भारताचे प्राणतत्व आहे. एकात्मतेशिवाय देशाची प्रगती, त्याचा विकास होऊ शकत नाही. देशाची एकात्मिक व सांघिक प्रगती ही एकात्मतेवर अवलंबून असते.  
समन्वयक प्रा. पी. वाय. जाधव यांनी उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, डॉ. प्रविण ताटे-देशमुख, प्रा. आर. एस जगताप, प्रा. मेघा जगताप, आर. डी. गायकवाड, डॉ. संजू जाधव, डॉ. श्रीकांत घाडगे, डॉ. बाळासाहेब मरगजे, डॉ. निलेश आढाव, प्रा.आदिनाथ लोंढे, डॉ. राहुल खरात, प्रा. रविकिरण मोरे, प्रा. नामदेव जाधव, प्रा. अनिकेत भोसले, प्रा.चेतना तावरे, प्रा. प्रियंका तांबे, प्रा. रोहित बोत्रे, अमोल काकडे, विनायक आगम, निखिल जगताप, सुजीत वाडेकर, अतुल काकडे, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यशाळा यशस्वी केली. तसेच महाविद्यालय व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. सुजाता भोईटे, सहसचिव श्री. सतीश लकडे इ. मान्यवर कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते. या कार्यशाळेला महाविद्यालयाच्या विविध शाखांमधील ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तर कु. गायत्री खैरे, कु. प्रतीक्षा भोसले व कु. अस्मिता कांबळे यांनी कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कल्याणी जगताप यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रा. कुलदीप वाघमारे यांनी मानले.
To Top