बारामती ! आई वडिलांच्या कष्टाचं चीज करा : अभिनेत्री तेजस्विनी लोणारी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर आयुष्यात कष्ट फार महत्वाचे आहेत. अपलेला आयुष्यात काहीतरी बनायचे आहे. हे करत असताना आपल्या आई वडिलांनी केलेले कष्ट कधी विसरू नका असे मत बिग बॉस फ्रेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांनी व्यक्त केले. 
           श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस, शरद सोमोत्सव 2K23 अंतर्गत शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या डिप्लोमा महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
          सदर कार्यक्रमात 2021-22 या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमामध्ये कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल व सिव्हील विभागातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गतवर्षी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचे मार्फत घेण्यात आलेल्या डी 2 झोन पुणे, अंतर्गत हॉलीबॉल, खो-खो, वेटलिफ्टिंग, ऍथलेटिक्स या स्पर्धांमध्ये विजेते व उपविजेते संघातिल विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
         तसेच दि. 11 ते 15 फेब्रुवारी 2023 दरम्यान महाविद्यालयात सांघिक व वैयक्तिक खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा सोमेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्षा प्रणिता खोमणे मा. उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर चीफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व विशेष अतिथी सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी तसेच  संचालक  सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, शैलेंद्र रासकर, ऋषिकेश गायकवाड,  प्रवीण कांबळे, सचिव भारत खोमणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. तसेच त्यानंतर विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदऊन विविध गाण्यांवरती ठेका धरत जल्लोष साजरा केला. यावेळी विशेष अतिथी सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सर्व क्षेत्रात विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व सोमेश्वरनगरचे शरदचंद्र पवार डिप्लोमा कॉलेज लय भारी असे गौरवउदगार काढले.
       तसेच या कार्यक्रमासाठी प्रियराज कन्स्ट्रक्शन नींबूत, पुनम ज्वेलर्स सोमेश्वरनगर, समता नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. निरा, प्रगती नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. निरा, यांचे प्रायोजकत्व लाभले या कार्यक्रमासाठी सर्व कॉलेजचे प्राचार्य यामध्ये सोमनाथ हजारे, डॉ. संजय देवकर, धनंजय बनसोडे, डॉ. निलेश निंबोरे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार् सोमनाथ हजारे यांनी केले व सूत्रसंचालन भोसले सी वाय कदम- घारे, शिंदे-होळकर, काकडे टी. एस. यांनी केले संस्थेचे चीफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आनंदकुमार होळकर यांनी सर्वांचे आभार मानले.
To Top