भोर ! सुसंस्कारांची माळ घालून उच्चशिक्षित व्हा : अनिल सावले : नेरे विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
आदर्शवत नागरिक घडण्यासाठी विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि प्रबोधनाकडे लक्ष देवून संस्कारक्षम व्हावे.तर सुसंस्कारांची पेरणी ही विद्यामंदिरांमध्ये होत असल्याने सुसंस्कारांची माळ घालून उच्च शिक्षित व्हा असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अनिल सावले यांनी केले.
     नेरे ता.भोर येथील पंचक्रोशी आदर्श विद्यालयात १० वीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवार दि.१७ परीक्षेसाठी शुभचिंतन देताना तसेच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी सावले बोलत होते.यावेळी संस्थेचे सदस्य गजानन आरानके, गोपाळ कुलकर्णी, प्रभारी मुख्याध्यापिका सुजाता भालेराव,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शत्रुघ्न सावले,सरपंच उज्वला बढे, उपसरपंच राजेंद्र चिकणे, विजय बढे, दशरथ सावले, विठ्ठल बुधे,अनिल वीर,संजय बुदगुडे ,महेश उभे उपशिक्षक रजनी पोतदार ,सदानंद जाधव, सारिका गुरव, सुनिता कदम, मदनमोहन मिरजे,चंद्रकांत कुंभार आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      सावले पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उच्चशिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावेतरच आयुष्य घडेल.
To Top