पुरंदर बिग ब्रेकिंग ! नीरा येथे बुवासाहेब ओढ्यावरील पुलात धावत्या कारने घेतला पेट : जीवितहानी टाळली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
नीरा बारामती रोडवरील बुवासाहेब ओढ्यावरील पुलात धावत्या कारने पेट घेतला. पुलाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी धावती कार पेटताना पाहून चालकास ओरडून कल्पना दिली. दैव बल्वत्तर म्हणून कोतीही जिवीत हानी नाही. 
          मारुती ८०० कार बारामतीच्या सोमेश्वर नगर येथून नीरा येथे चालली होती. या कारमध्ये संपूर्ण कुटुंब होते. दोन महिन्याचे बाळासह आई वडिल व काही वस्तू या गाडीत होत्या. पुलाचे काम करणाऱ्या कामगारांनी चालकास कल्पना देत सर्वांना गाडीतून खाली घेतले. शेजारीच असणाऱ्या गँरेज चालकाने धाडस दाखवत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पेटती गाडी रस्त्यातून बाजुला घेतली या सर्व घटनेचे युवकांनी व्हिडीओ चित्रीकरण केले.  रहदारीच्या रस्त्यावर ऐन गर्दीच्या वेळी कारने पेट घेतल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 
              संथ गतीने सुरु असलेल्या या पुलाच्या कामामुळे दररोज काही तरी वेगळे पहावयास मिळत असल्याची चर्चा या ठिकाणी लोक करत होते. दररोज एकातरी वाहनाचा या तकलादू पुलात घोटाळा होय असतो. त्यामुळे वाहनांच्या रांगा आणि ट्राफिक जाम नित्याचेच झाले आहे.
To Top