सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
अरे क्या शिंघम...उधर जयकांत गरम...इधर तू गरम...मामलेको थंडा करनेके लिए मै आया....सिंघम छोड दे ना मरे आदमीयोको...एफआयआर फाड दे...ऐसें चार बुक चकाचक प्रिंट कारवाके देता हू तुझें..... हा शिंघम मधील डायलॉग मारत शिंघम फ्रेम अशोक समर्थ यांनी उपस्थितांची मने जिंकली..आणि तरुणाईने एकच जल्लोष केला.
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहिणी जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर होते. यावेळी सोमेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, मा.उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, संचालक अभिजित काकडे, शैलेश रासकर, सुनील भगत, जितेंद्र निगडे, तुषार माहुरकर, मनीषा होळकर, सुचेता साळवे, संस्थेचे सचिव भारत खोमणे, प्राचार्य डॉ. संजय देवकर, प्राचार्य सोमनाथ हजारे, प्राचार्य धनंजय बनसोडे, नितीन यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
अशोक समर्थ पुढे म्हणाले, सुरुवातीला घरातून ९० रुपये २० पैसे घेऊन घरातून बाहेर पडलो. ते ९० रुपये संपल्यावर खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागल्याचे त्यांनी सांगितले. मात्र खचून न जाता त्यातून मार्ग काढत गेलो. वेळप्रसंगी बसस्टँड रेल्वे स्थानकावर झोपलो. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यावेळी खूप मोलाचे सहकार्य केल्याचे अशोक समर्थ यांनी आवर्जून सांगितले. लक्ष या मराठी मालिकेने लोकांच्या घराघरात पोहचलो तर शिंघम या चित्रपाटातील शिवा नायकाच्या भूमिकेने एक वेगळी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रनाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ संजय देवकर यांनी मानले तर आनंदकुमार होळकर यांनी आभार मानले.