सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
पुरंदर : प्रतिनिधी
गुळूंचे कर्नलवाडी गावच्या पश्चिमेला असलेल्या बोलाईमाता डोंगराच्या पायथ्याला नियोजित खडिमशीनला वीज वितरणने डि.पी.सह सुमारे ५० पोल टाकून वीज पुरवठा केला. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनूसार वास्तविक हा वीजपुरवठा पोल्ट्री व्यावसायासाठी देण्यात आला होत, तर आता त्या ठिकाणी धोकेदायक व पर्यावरणाला हानिकारक असलेल्या खडिमशीनला वापर होणार असल्याने दोन्ही गावचे ग्रामस्थ वीज वितरणच्या भुमिकेबाबत संतापले आहे.
पुरंदरच्या नियोजित विमानतळामूळे आता पुरंदरच्या जमीनी खरेदी करण्यावर बारमतीकर सरसावले आहे. बारामतीतील धनिक पुढाऱ्यांकडून पुरंदरचे माळरानावर खडिमशीन तसेच विमानतळाला लागणाऱ्या पायाभुत सुविधा देत मलाई कशी पदरात घेता येईल यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राजकीय वरदहस्ताचा गैरफायदा घेत हे पुढारी शासनाच्या अधिकाऱ्यांना दबावत घेत परवाग्या घेतात व स्थानिकांना अंधारत ठेवतात. प्रशासकीय परवाणगी आहे आता कोणी विरोध करू नये असा दम दिला जातो.
गुळूंचे कर्नलवाडी परिसरात बारामती तालुक्यातील सोमेश्वरचे संचालक शैलेंद्र रासकर यांनी खडीमशीनचा घाट घातला आहे. तीन वर्षांपूर्वी पोल्ट्री व्यावसाय करण्याहेतू वीज कनेक्शन मिळावे यासाठी ना हरकत दाखल्याची शैलेश रासकर यांनी गुळूंचे ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती. ना हरकत दाखल्याच्या आधारे रासकर यांनी वीज कनेक्शन व डिपी मंजूर करुन घेतला. पण गुळूंचे ग्रामपंचायतीने रासकर यांच्या त्या मिळकतीवर पोल्ट्रीची नोंद केली नाही. तीन वर्षांत तशी पाहणी करुन नोंद ही घेतली नाही. आता त्याच वीजपुरवठ्यावर धोकेदायक खडिमशीन चालु करण्याचा घाट रासकर करत असल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व वीज वितरण विभागाच्या धोरणांवर शंका निर्माण केल्या.
वीज वितरणचा असलेल्या राखीव फंडातून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर ५० खांब टाकत रासरक यांच्यासाठी नव्याने लाईन टाकण्यात आली. त्यावेळी थोपटेवाडी गावचे माजी सरपंच खरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्या शेतातून हे खांब टाकू नये अशी विनंती केली, पण रासकर यांनी पोलीस बंदोबस्तात हे काम करुन घेतले. थोपटेवाडीतील ग्रामस्थांना शासकीय कामात अडथळा आणल्यास गुन्हे दाखल करण्याचा दम देण्यात आला होत. पोलीसांच्या या दमबाजीमुळे ग्रामस्थांनी परत कधी विरोध केला नाही.
ग्रामीण भागातील शेतकरी किंवा नव्याने घर बांधल्यानंतर कितेक महिने वीज कनेक्शन मिळत नाही. कर्नलवाडीतील एका शेतकऱ्याने गेली अडीच वर्षांपूर्वी लाखो रुपये डिपॉझिट भरूनही कनेक्शन मिळाले नाही. मग अशा धनिक पुढाऱ्यांना तातडीने कसे वीज कनेक्शन मिळते याबाबत गुळूंचे कर्नलवाडी ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.