भोर ! सविता तनपुरे 'तेजस्विनी' राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोंडेवाडी ता.भोर येथील आदर्श शिक्षिका सविता तनपुरे (थोपटे) यांना रत्नागिरी येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा राज्यस्तरीय मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तेजस्विनी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महसूल मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, आमदार योगेश कदम ,तालुका शिक्षक संघटना अध्यक्ष सुदाम ओंबळे ,शिक्षक नेते पोपट निगडे,बापू जेधे, प्रदीप बदक, महादेव बदक, अरविंद बढे,जयवंत जाधव, महेंद्र सावंत,सुनील थोपटे,पंडित गोळे,आनंदा सावले संपत रांजणे आदींसह शेकडो शिक्षक उपस्थित होते.
    युट्युब वर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्हिडिओंची निर्मिती, शैक्षणिक उठावातून भौतिक सुविधा ,डिजिटल शाळा, यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धेत सलग तीन वर्ष जिल्ह्यावर नंबर, स्वानंदी शिक्षण व संविधान या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, कोरोना काळात शंभर टक्के शाळा चालू ठेवून विविध उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांना कोडींग प्रशिक्षण ,मासिक पाळी प्रबोधन ,किशोरी मेळावा,मातापालक मेळावा इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.
To Top