सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोमेश्वरनगर येथील शाखेतील कॅशिअर मयूर मोरे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
सोमेश्वरनगर येथील पुनम ज्वेलर्स चे मालक किरण आळंदीकर बँकेत भरणा घेऊन गेले होते, त्यांनी बँकेत १२ लाख ८५ हजार रकमेचा भरणा केला होता, कॅशिअर कडे पैसे देऊन तेथे उपस्थित असणाऱ्या मित्रांसोबत आळंदीकर गप्पा मारत असताना कॅशिअर ने त्यांना बोलावून ७ हजार रुपये जास्त आल्याचे सांगून ते त्यांना प्रामाणिकपणे परत केले, यावर बोलताना आळंदीकर यांनी सांगितले, एका ग्राहकाने ५०० च्या नोटा असलेले ५७ हजार रु. आपल्याला दिले होते, त्यावेळी दुकानात गर्दी होती आणि चुकून त्या नोटांच्या बंडलवर ५० हजार रक्कम पेन्सिल ने लिहिली गेली होती.. त्यामुळे त्या दिवशीच्या विक्री चा हिशोब लागत न्हवता, परंतु कॅशिअर च्या प्रामाणिकपणामुळे पैसे परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करून, कॅशिअर ला सर्व खातेदार, स्टाफ समोर बोलावून त्यांचे कौतुक करून आभार मानले.