सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने किलबिल हाऊस प्ले स्कूल, माळेगाव बु. यांच्या वतीने रंगवर्षा या चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत शिशु गटापासून ते 10 वी पर्यंत च्या एकूण 320 मुलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमा साठी चंदूकाका सराफ अँड सन्स लि. मुख्य प्रयोजक होते तर नमस्तुभ्यम अभ्यासिका, माळेगाव बु, आणि केकीज शॉप माळेगाव हे सह प्रयोजक होते. कार्यकामाचे प्रमुख पाहुणे समीर वर्ल्ड स्कूल चे प्राचार्य कुऱ्हाडे सर, मालेगाव चे माजी सरपंच जयदीप तावरे जेष्ठ उद्योजक अशोक सस्ते उपस्थित होते. यावेळी चंदूकाका सराफ चे मार्केटइंग विभाग प्रमुख धनंजय माने इतर पदाधिकारी उपस्थित होते. वय वर्षे 3 ते 5 या शिशु गटात शिवम महामुनी प्रथम नेत्राली झगडे दितीय शरण्या कदम तृतीय आणि संयोगिता लाड - उ्तेजनार्थ असे विजेते ठरले.
1 ली ते 4थी गटामध्ये कार्तिक महामुनी नितीन कुमावत, श्रीमयी जगताप हे विजेते ठरले तर 5 वी ते 7वी गटात आर्या लोणकर, रोनक कुमावत, शौर्य जगताप हे विजयी झाले. 8वी ते 10वी गटामध्ये कु. सुष्टी बोराटे हिने प्रथम क्रमांक पटकवून सायकल ची मानकरी ठरली, समृद्धी कोंडे, रिक्षिका भोसले आणि ईश्वरी बुरुगले उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवून विजयी झाले.
या कार्यक्रमासाठी किलबिल हाऊस च्या सर्व सदस्यांनी योगदान देत कार्यक्रम यशस्वी पार पाडला. सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कापडी पिशव्यांची वाटप करण्यात आले.
--
COMMENTS