बारामती ! आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करावी : बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाची मागणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोरगाव येथील पत्रकार विनोद पवार यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जमिनीच्या वादातून खुणी हल्ला केला आहे. 
        संबंधित आरोपी मंगेश जगताप रा.मुर्टी,ता.बारामती, जि. पुणे, सागर शिनगारे रा. पांढेश्वर ता.पुरंदर जि.पुणे व इतर चार अनोळखी व्यक्तींनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. यासंदर्भात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असून संबंधित आरोपीना तात्काळ अटक करून कडक कारवाई करा अशा मागणीचे निवेदन बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांना देण्यात आले.
         यावेळी भोईटे साहेबांनी निवेदन स्वीकारत संबंधित आरोपींवर ३०७ सारखे कलम लावून गुन्हा दाखल केला असून तसेच मुख्य आरोपीलाही अटक केली आहे व इतर आरोपीही लवकरच अटक करू असे आश्वासन यावेळी उपस्थित पत्रकारांना दिले. भोईटे यांनी यावेळी संबंधित गुन्ह्यातील तपासी अधिकारी यांच्याशी फोनवरून  संपर्क साधत फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या.
          यावेळी बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मोरे, माजी अध्यक्ष महेश जगताप, सचिव चिंतामणी क्षीरसागर, उपाध्यक्ष युवराज खोमणे, नाविद पठाण, मनोहर तावरे, अशोक वेदपाठक, सचिन वाघ, अमर वाघ, पल्लवी चांदगुडे, सचिन पवार इत्यादी पत्रकार यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनाही बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे निवेदन देण्यात आले.
To Top