सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी
पानिपतच्या युध्दात महाराष्ट्राची मोठी पिढी खर्ची पडली ती कशासाठी तर भारताला भारत ठेवण्यासाठी महाराष्ट्र दिल्लीत धावुन गेला होता. भगव्या झेंड्याची शपथ घेवुन द्वारका, मथुरा, काशिविश्वेश्वर , पंढरपूर तिर्थक्षेत्र टिकण्यासाठी मराठा एकवटला होता. इस्लामी करण हे अरबी मुसलमानांचा धर्म हा मानवता वादीला लागलेला कलंक आहे. या देशाचे इस्लामीकरणाचा डाव कोणी उधळला असेल तर तो महाराष्ट्र विरांनी उधळविला आहे. नझीर नावाच्या मुसलमानाचे थडगे तोडून टाकल हे काम सातारकरांनी केल म्हणून सातारच्या रक्तात इतिहास आहे असे धनंजय महाराज देसाई यांनी सांगीतले.
मेढा येथिल तालुक्याच्या मुख्यालयात हिंदु जन आक्रोश मोर्चाच्या समोरप प्रसंगी बोलत होते. यावेळी आ. श्री छ. शिवेंद्रसिंहराजे भासले आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना धनजंय महाराज देसाई पुढे म्हणाले शिवाजी महाराजांची रणनिती , धर्मनिती ही व्यक्तीगत स्वार्थाची , खुळचट, पुचाट अशा आत्मिक संरक्षणाची नव्हती. ती राष्ट्र निर्मितीची होती. अफजल खान हा देवदेवतांचा, भक्तांचा शत्रु होता असेही देसाई यांनी सांगातले.
ते पुढे म्हणाले आदीलशाही, मुगलशाही कडून मिळत असताना सुद्धा स्वतःचे बलीदान करणारे श्री छ. संभाजी महाराज हे आमच्या साठी नव्हे तर जगासाठी धर्मवीर होते. स्वकियांचे धर्मराष्ट्र सुरक्षित रहावे म्हणुन त्यांनी स्वतःच्या देहाचे बलीदान दिले. औरंगजेब सुध्दा त्यांना धर्मवीर म्हणत होता परंतु औरंगजेबाच्या अनौरस औलांदीना मात्र ते धर्मवीर होते की स्वराज्य रक्षक होते या विषयी संभ्रह निर्माण झाला आहे असेही देसाई यांनी सांगितले.
यावेळी जितेंद्र आव्हाडांवर टिका करताना धनंजय महाराज म्हणाले तळवे चाटून मुंब्य्रातुन निवडुन येतात आणि अफजल खान होता म्हणून शिवाजी महाराज होते. अफजल खानामुळे, औरंगजेबामुळे, शाहीस्तेखानामुळे तुम्ही जन्माला आलाय आणि तुम्ही डोक्याची डोकेदुखी आहात अशी जहरी टिका करीत स्वकुळेच कुऱ्हाडीस दांडा गोतास काळ असे सांगुन हिंदू मध्ये खंडोजी छोपडे, हिंदुजी पिसाळ, आव्हांडा सारखी पिलावळ नसती तर हिंदु संभ्रमीत झालाच नसता असेही देसाई यांनी यावेळी बोलताना सांगीतले.
गोहत्या, धर्मांतरण आणि लव्ह जिहाद यासाठी कडक कायदे झाले पाहीजेत. आपल्या पिढीला पुन्हा असे मोर्चे काढावे लागु नयेत या साठी संसदेत बेवडे खासदार नकोत त्यासाठी देवधर्म माननारा खासदार संसदेत पाहीजे. हिंदुच्या विरोधात असणारा राजकीय पक्ष उपटून काढला पाहीजे असेही आवाहन यावेळी धनंजय महाराज देसाई यांनी केले.
यावेळी श्री छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले हा मोर्चा कोणा विरोधात नाही. कोणी वेगळी भावना निर्माण करू नये परंतु हिंदु धर्मावर येत असलेल्या संकटावर आहे. राज्य शासन, केंद्र शासन व प्रशासन यांच्या पर्यत असणारी धर्मा बाबतची भविष्यातील भिती पोहचविण्यासाठी हा मोर्चा आहे असे सांगुन छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांना छोट करण्याचा काम काही जण करत आहेत आणि हे एक षढयंत्र आहे परंतु कोणी स्वतः ची राजकीय पोळी भाजण्यासाठी छत्रपती शिवाजी महारांजांना छोट दाखविण्याच काम करतय हे आम्ही खपवुन घेणार नाही असा इशारा यावेळी आ. भोसले यांनी दिला.
दरम्यान मेढा बसस्थानकापासुन मोर्चाला सुरुवात होवुन तो पोलीस ठाण्याकडून पोलीस ग्राऊंड पर्यत आणण्यात येवुन तेथे संगता सभा घेण्यात आली. गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतरण विरोधी कायद्यांसह आदी मागण्यांचे निवेदन पाच मुलींच्या हस्ते तहसिलदार यांना देण्यात आले. या मोर्चामध्ये महिलांचा उत्स्फुर्त सहभाग होता. हजारोंच्या संख्यांनी लोक सहभागी होवून विविध घोषणा देत होते.