पुरंदर ! नीरा येथे २० वर्षीय महाविद्यालयीन युवकाची आत्महत्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी 
नीरा (ता. पुरंदर) येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
           घटनास्थळी पोलिसांनी काल दि . ६ रोजी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता. याबाबत स्थानिक मिळालेल्या माहितीनुसार, नीरा येथील प्रभाग १ मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्याची यश अजित कांबळे (वय २०) याने सायंकाळी घरात कोणी नसताना, फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला आहे. तो सोमेश्वर येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात शिकत होता. तो बीबीए (सी.ए.) द्वितीय वर्षांच्या वर्गात शिक्षण घेत होता.
To Top