पुरंदर ! नीरा येथे उद्या शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
उद्या दि ७ रोजी नीरा ता पुरंदर येथे शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पुरंदर च्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली. 
          तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी आज ग्रामपंचायत कार्यालय नीरा येथे भेट देऊन नीरा व नीरा परिसरातील तलाठी भाऊसाहेब ग्रामसेवक आरोग्य कर्मचारी  विजमंडल कर्मचारी पोस्ट ऑफिस कर्मचारी यांची बैठक घेतली. यामध्ये सामान्य नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेणे व शासनाच्या नावीन्य पूर्ण योजनांची महिती करून देणे ई साठी गुळुंचे राख मावडी कर्नलवाडी वाल्हे पिसूर्टी पिंपरे थोपटेवाडी आदी गावांच्या तलाठी ग्रामसेवक व इतर कर्मचारी यांना बोलावून शासकीय योजनांमध्ये नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.
             उद्या दि.७/२/२३ रोजी राधा कृष्ण मंगल कर्यालय नीरा येथे शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात जास्ती जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी केले. 

           
To Top