सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांची १९१ वी पुण्यतिथीनिमित्त करंजेपुल येथे अभिवादन करण्यात आले. उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. ३ फेब्रुवारी १८३४ पुण्याच्या खडकमाळ आळी येथिल मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी फाशी देण्यात आली. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या काळात राजे उमाजी नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता.
आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी करंजेपुल पोलिस चौकीत जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पै. नानासाहेब मदने यांच्या नेतृत्वाखाली साजरी करण्यात आली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार, सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड, सरचिटणीस सुचिता साळवे, सरपंच वैभव गायकवाड, उपसरपंच निलेश गायकवाड, वाकीचे सरपंच किसन बोडरे, पत्रकार महेश जगताप, युवराज खोमणे यांच्या हस्ते हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन वाकीचे सरपंच किसन बोडरे, अलका भंडलकर, तेजश्री भंडलकर, ऊर्मिला मदने, सुवर्णा जाधव, कुमार भंडलकर, पांडुरंग घळगे, लता मदने यांनी केले होते.