सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम डोंगरी भागातील जयतपाड ता.भोर येथे ग्रामदैवत वाढेश्वर मंदिरा जवळील वडाच्या झाडावर पारंब्यांना अज्ञात तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना आढळून आल्याची घटना सोमवार दि.६ घडली.ग्रामस्थांनी भोर पोलिसांशी संपर्क साधून मृतदेह भोर पोलिसांच्या ताब्यात दिला.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयंतपाड येथील वाढेश्वर मंदिरासमोरील वडाच्या झाडावर पारंब्यांना एका अज्ञाताने गळफास घेतल्याचे ग्रामस्थांना आढळले.भोर पोलीस घटनास्थळी पोहोचून वडाचे झाडावरून मृतदेह सोडविला असता या इसमाच्या अंगावरील पँटच्या डाव्या बाजूचे खिशात आधार कार्ड मिळून आले. त्यावरून मृतदेह नारायण धाधू गंझु वय-३४ मूळ रा. रामजडी बांसजोर सिमडेगा बांसजोर ( झारखंड ) सध्या रा.जयपाड ता.भोर असे सिद्ध झाले.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही मात्र ही आत्महत्या की घातपात याचा तपास भोर पोलीस करीत आहेत. पुढील तपास भोर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हवालदार वर्षा भोसले करीत आहेत.