फलटण ! प्रशांत रणवरे ! नीरा नदी कुठंय माहिती नाही.... आणि गप्पा सांगतायत तीन हजार नऊशे कोटींच्या....दोन हजार कोटींची गरज असताना जास्तीचा निधी आणून अजून एक कारखाना काढायचा आहे काय ! आ. रामराजे यांची खा. रणजितसिंह यांच्यावर टिका

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
फलटण : प्रतिनिधी 
ज्यांना नीरा नदी कुठं आहे माहिती नाही ते म्हणत आहेत की नीरा देवधर प्रकल्पासाठी तीन हजार 900 कोटी रुपये आणल्याचे सांगत सर्वत्र गवगवा केला जात आहे. मात्र या प्रकल्पसाठी दोन हजार कोटी रुपयांची गरज आहे.  मग उरलेले एक हजार 900 कोटी रुपये घेऊन खासदारांना अजून एक कारखाना काढायचा आहे का ? असा खोचक सवाल देत आम्ही आमच्या आजोबाच्या घरात राहत आहोत. खासदाराकडे बंगले कुठून आले ? असे विचारत स्वतःला बोलता येत नाही म्हणून इतर आमदारांना तालुक्यात आणून त्यांचे पीए खासदार झाले आहेत; अशी चौफेर टीका आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली. 
         वाठार  निंबाळकर, ता. फलटण येथे शेतकरी मेळाव्यात आमदार रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आमच्या फलटणच्या हक्काचे पाणी पंढरपूर व सांगोलाला देणारे हे कोण ? असा सवाल करीत पंधरा दिवसात पंधराशे कोटी आणले तसेच माढा मतदारसंघात लाखो कोटी रुपयांची विकासकामे केल्याचा गवगवा करीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर फिरत आहेत. मात्र मी मोदींना आडवा चाललो नसतो तर महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी थांबलेच नसते तर तुम्ही काय केले असते ? तुम्हाला दिल्लीसाठी निवडणून दिले आहे. तुम्ही खाली काय करता ? असा टोला लगावित मी आणि आमदार दीपक चव्हाण इथे आहेत तालुक्यातील रेल्वे साठी प्रयत्न केले. निधी आणला. मात्र आणलेली रेल्वे पुढे धावलीच नाही. त्याचप्रमाणे नीरा देवधर प्रकल्पाला मी व तत्कालीन राज्य सरकार तसेच खासदार शरदचंद्रजी पवार  यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम करण्याचा खरा खुरा प्रयत्न केला. मात्र राजकारणांत अपप्रवुत्ती आल्याने राजकारणाची पातळी खलावली खासदारांनी काढलेल्या साखर कारखान्यामध्ये लोकांच्या उसाचे व कामगारांच्या मेहनीतीचे पैसे दिले जात नाहीत. आमच्याकडे येत असताना लोक ताठ मानेने येतात. त्याचवेळी खासदारांकडे जाताना लोक बिल्लीप्रमाणे जातात. सोशल मीडियावर काही बोलला तर त्याला काय केले जाईल याचा नेम नाही त्यामुळे लोक व पत्रकार खरे लिहण्यास धजावत नाहीत. त्यांना पाहिजे एवढे खाद्य मी  देतो मात्र ते मलाच टार्गेट करतात; अशी खंत आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी बोलावून दाखवली.
    यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की नीरा देवधर धोम बलकवडी च्या कामांचा श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न खासदार रणजितसिंह करीत असून मी आणलेल्या पाण्यावरच खासदारांनी कारखाना काढला,हे जग जाहीर आहे,पण त्यांनी आणलेली ट्रेन कधी धावल्याचे पाहिले आहे का,खासदारांनी त्यांची दिल्लीत कामे करावीत आम्ही राज्यातील कामे करण्यास समर्थ आहोत,खासदार रणजितसिंह यांनी बजेट मध्ये तरतूद केली आहे त्याचा उलगडा करावा,असे आव्हान देत खासदारांनी साखरवाडी कामगारांच्या फंडासंदर्भात धमकीचे फोन केल्याचा गंभीर आरोप यावेळी आमदार श्रीमंत रामराजे यांनी केला,व मी व आमदार दीपक चव्हाण फलटण च्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत येणाऱ्या सर्व निवडणुकीत बरोबर राहण्याचे आवाहन केले यावेळी आमदार दीपक चव्हाण,श्रीमंत शिवरूराजे खर्डेकर,डि.के. पवार,धनंजय पवार,रामभाऊ ढेकळे,विवेक शिंदे,सरपंच सुवर्णाताई नाळे, नंदू शेठ नाळे व इतर राजे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
To Top