सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
खेड शिवापुर टोल नाक्यावर आज दि.१ पासून तालुक्यातील सर्व स्थानिक वाहनांकडून टोल वसुली करण्यात येणार असल्याने स्थानिकांनाही आता टोलचा भुर्दंड बसणार आहे.अशी माहिती टोलनाका व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
खेड शिवापुर टोल नाका हटाव कृती समितीच्या वतीने १६ फेब्रुवारी २०२० ला आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये आंदोलन कर्ते यांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे ,कुलदीप कोंडे, माऊली धारवडकर व असंख्य आंदोलन कर्त्यांसमोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तात्कालीन संचालक सुहास चिटणीस पुणे- सातारा टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड खेड शिवापुर येथील व्यवस्थापक अमित भाटिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर चर्चा होऊन पुढील मार्ग निघत नाही तोपर्यंत एमएच १२ व एमएच १४ च्या सर्व वाहनांना टोल माफी देण्यात आली असे पत्र आंदोलन करताना दिले होते.मात्र दिलेला शब्द त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे व टोल नाका प्रशासन यांच्याकडून फिरवण्यात आलेला आहे.त्यामुळे झालेल्या आंदोलनामुळे नागरिकांना टोल नाक्यावरती सवलत देण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी त्यातील पुणे व पिंपरी चिंचवड शहर यांना टोलनाक्यातून वगळण्यात आले होते व त्यांच्याकडूनही टोल वसूल करण्यात येऊ लागला होता असे असताना भोर व वेल्ह्यातील नागरिकांना ओळखपत्र दाखवून टोलमध्ये सूट देण्यात येत होत मात्र बुधवार दि.१ पासून सर्व स्थानिक वाहनांकडून टोल वसुली करण्यात येणार आहे.
COMMENTS