बारामती ! वाघळवाडी ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांचे चौकशीचे आदेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- -
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी -सोमेश्वरनगर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत तर ग्रामपंचायतच्या दप्तराची तपासणी करून अहवाल सात दिवसात सादर करण्याचे आदेश बारामतीचे गटविकास अधिकारी यांनी दिले आहेत. 
               महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे व वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या  ग्रामसेवक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन दोन वेतन वाढ देण्यात येऊ नयेत याबाबत पुणे जिल्हा परिषदेकडे स्थानिक रहिवाशी प्रदीप मांगडे यांनी केलेल्या मागणीला यश आले असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बारामती पंचायत समिती कार्यालयाला याबाबत चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
        माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश यादव आणि प्रदीप मांगडे यांनी वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या दफ्तर तपासणी होत नाही तोपर्यंत पुर्वपरवाणगी शिवाय धनादेश काढू नयेत याबाबत अर्ज केला होता. याबाबत गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी आर. व्ही. चांदगुडे यांना याबाबत चौकशी करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. ग्रामपंचायत दप्तर तपासणी, करवसुली, ५ टक्के दिव्यांग कल्याण खर्च, १५ टक्के मागासवर्गीय सुधार खर्च, १४ वा व १५ वा वित्त आयोग याबाबत सखोल तपासणी करून अहवाल सादर करण्याअ सांगितले आहे. गेल्या चार महिन्यांपासून केलेल्या तक्रारींची दखल जिल्हा परिषदेने घेतली असून विविध अर्जांच्या चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. 
To Top