बारामती ! दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण : वडगाव निंबाळकर पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल

Admin
2 minute read
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
आम्हाला दारू पेयची आहे, तु दारू पियाला आम्हाला पैसे दे म्हणत शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबी धनाजी गुलाबराव गाडेकर रा.चोपडज,ता. बारामती जि.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बि-या गायकवाड,  गणेश गायकवाड, गणेश गुजले, दत्तात्रय छबन गाडेकर व बापु जगदिष गायकवाड सर्व रा.चोपडज ता.बारामती जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 
        सविस्तर हकीकत फिर्यादी धनाजी गाडेकर यांनी चोपडज येथील महादेव मंदिराजवळ बि-या गायकवाड गणेश गायकवाड, गणेष गुजले दत्तात्रय छबन गाडेकर व बापु जगदिष गायकवाड सर्व रा.चोपडज ता.बारामती जि.पुणे हे फिर्यादी जवळ आले आणि फिर्यादीला म्हणाले की,आम्हाला दारू पेयची आहे.तु दारू पियाला आम्हाला पैसे दे,त्यावेळी  फिर्यादी त्यांना म्हणाला की,माझेकडे सध्या पैसे नाहीत असे म्हणालेनंतर वरील सर्वानी फिर्यादीला  शिवीगाळ करून त्यामधील गणेश गुजले,दत्तात्रय छबन गाडेकर,बापु जगदिश गायकवाड यांनी हाताने लाथ्थाबुक्क्याने मारहाण करून बि-या गायकवाड आणि गणेश गायकवाड यांनी त्यांचे हातातील लाकडी काठीमध्ये फिर्यादीचे दोन्ही पायांच्या मांडीवर तसेच पाठीवर मारहाण करून फिर्यादीला  दमदाटी केली आहे.
To Top