सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
दि.22/03/2023 रोजी रात्री 8.15 ते 8.20 वाजणेचे सुमारास वेळे ता वाई गावचे हद्दीत वेळे ते गुळूंब जाणारे रोडवर वेळे येथील स्मशानभुमीजवळ ब्रिजचे काम चालु असले ठिकाणी गंगाराम यादव ( फिर्यादी ) यांचा मुलगा प्रमोद यादव हा आपले ताब्यातील टिव्हीएस स्टार कंपनीची मो.सा. नंबर MH 11 AN -8222 यावरुन वेळे बाजुकडुन गुळूंब बाजुकडे भरधाव वेगात मोटर सायकल चालवित घेवुन जात असताना ब्रिजचे काम चालु असलेने रस्त्यावर पत्रा लावलेला होता. पत्र्याचे बाजुनेच रोडचे डायव्हरशन केले होते. प्रमोद यास रस्त्याचे डायव्हरशन न दिसलेने, मोटार सायकलची समोर असलेल्या ब्रिजच्या भिंतीला जोराची धडक बसुन प्रमोद व त्याचे पाठीमागे बसलेला प्रथमेश संतोष खैरे वय-21 वर्षे रा. ब्राम्हणशाही वाई हे दोघे उडुन दुस-या भिंतीच्या खाली मोटार सायकलसह पाण्यात पडले.
त्यामध्ये दोघे गंभीर जखमी होवुन अपघातात मयत झाले आहेत. अपघातात मोटार सायकलचे नुकसान झाले आहे.तरी गंगाराम यादव यांनी सदर अपघाताबाबत प्रमोद यादव यांचेविरुद्ध स्वतःच्या ताब्यातील मोटरसायकल परिस्थितीचे भान नराखता चालवल्याने तक्रार दाखल केली आहे याचा अधिक तपास भुईंज पोलीस स्टेशन करत आहेत.