सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबाडे ता.भोर येथे गुढीपाडव्याचे औचित्य साधून पारंपारिक पद्धतीने पंचांग वाचन करण्याची परंपरा कायम राखीत पुढील नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली.
गुढीपाडव्याला घरोघरी सकाळी सूर्योदय होताच गुढी उभारली जाते.तर दुपारच्या दरम्यान पंचांग वाचनात पुढील वर्षीच्या ऋतू-नक्षत्रानुसार नवीन वर्षात होणारे निसर्गाचे होणारे बदल यावर तासनतास तरुण व बुजुर्ग नागरिकांची ग्रामदैवताच्या मंदिरात बैठक होऊन चर्चा केली जाते. यावेळी बैठकीतील नागरिकांना लिंबाच्या पानाचा विडा देवून त्यानंतर चहा पान केले जाते. तालुक्यात बहुतांशी गावांमध्ये अशा प्रकारचे पंचांग वाचन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होत असते.या पंचांग वाचनाच्या कार्यक्रमासाठी गावागावातील लहान थोर मंडळी आवर्जून वेळ काढून बैठकीला उपस्थित राहतात अशी माहिती बुजुर्ग व्यक्तींकडून देण्यात आली.यावेळी शेकडो नागरिक उपस्थितीत होते.
COMMENTS