भोर ! रुपेश जाधव राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
अभ्यासू लिखाणाच्या माध्यमातून निर्भीड पत्रकारिता करून प्रशासनाचे लक्ष वेधून जनसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे भोर तालुक्यातील पत्रकार रुपेश जाधव यांना क्रांतिसूर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२३ चा "क्रांतिसूर्य आदर्श पत्रकार" पुरस्कार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबा सावंत,सी आर ग्रूप संस्थापक अध्यक्ष ॲड. हेमचंद्र मोरे, डीवायएसपी बारामती गणेश इंगळे, प्रदेश अध्यक्ष माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण महासंघ सलीमभैय्या शेख, प्रा.डॉ अरुण कांबळे, भीमा कोरेगाव लढाईतील सरसेनापती सिदनाक महार यांचे १३ वे वंशज राहुलजी इनामदार ,सिने अभिनेता बाबा गायकवाड, वेब सिरीज प्रसिध्द कलाकार छोटू दादा,यांच्या हस्ते सोमवार दि.२० मार्च ला  रत्नपूरी वालचंदनगर (इंदापूर )येथे देऊन सन्मानित करण्यात आले.
       सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून त्यांना मिळालेल्या पुरस्कराबद्दल त्यांचे तालुक्यातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.
"क्रांतिसूर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुरस्कार देण्यात आल्याने सामाजिक जबादारी वाढली असून मला मिळालेला हा सन्मान ह्यामध्ये माझे दै.नवराष्ट्र चे सर्व मार्गदर्शक ह्यांचा खूप मोलाचा वाटा आहे".
To Top