सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
नगर-सातारा महामार्गावरील उद्या दि २३ ते २७ मार्च २०२३ या दरम्यान गुळुंचे-कर्नलवाडी या ठिकाणी रस्त्यावरील चढ काढण्याचे काम सुरू होणार असून निरेकडून मोरगाव कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी नीरा-जेजुरी-मोरगाव या पर्यायी रस्त्याचा वापर करावा.
याबाबत बारामती बांधकाम विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटणले आहे, निरा-मुर्टी-मोरगाव सुपे रस्ता प्रजिमा ६७ किमी ५/८५० ते ९/८५० व २१/६५० ते २४/०० मध्ये सुधारणा करणे, या कामांतर्गत किमी ६/६६० से ७/०२५ भाग गुळुंचे कर्नलवाडी हद्दीमध्ये या लांबीमधील कठीण चढाचे खोदकाम करणेचे काम या उपविभागाचे देखरेखीखाली इंडिकॉन कन्स्ट्रक्शन, सातारा रोड पुणे यांचेमार्फत प्रगतीत आहे. या रस्त्याचे किमी ६/६६० ते ७०२५ भाग (गुळुंचे कर्नलवाडी हद्दीमध्ये) या लांबीतील खोदकाम करण्यासाठी दि. २३/३/२०२३ ते २७/३/२०२३ या कालावधीमध्ये रस्ता बंद करणे आवश्यक आहे. यास्तव वरील कालावधीमध्ये रस्ते वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या रस्त्यावरील अवजड वाहने व इतर वाहतूक निरा वाल्हे जेजूरी-मोरगाव या पर्यायी मार्गाने वळवण्यात यावीत.
COMMENTS