सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन यांना सुमारे ४ दिवसापुर्वी गोपनीय बातमीदरामार्फत बातमी मिळाली होती की, वाई शहरातीतल मुले वेळे येथील अल्पवयीन मुलाचा खुन करणार आहेत. त्या अनुषंगाने बातमीची शहानिशा करुन संशयीतांना तात्काळ ताब्यात घेणे बाबत गुन्हेप्रकटी करण विभागाचे कर्मचा-यांना सुचना दिल्या होत्या. त्यानंतर आशिष कांबळे, सपोनि वाई पोलीस स्टेशन व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचा-यांनी बातमीची शहानिशा करणे करीता वाई शहरात व वेळे येथे नेमूण संशयीतांच्या हालाचीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. त्यादरम्यान १ मुलगा व ४ अल्पवयीन मुलांनी वाई शहरात एका चप्पल विक्रीच्या दुकानात बसून कट केलेला असल्याची माहीती समजली होती. दि. २१ रोजी बाळासाहेब भरणे, यांचे आदेशानूसार आशिष कांबळे, व डी बी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी कट रचणारे १ मुलगा व ४ अल्पवयीन मुलांना वाई शहरातून व वेळे गावातून ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, वेळे येथील अल्पवयीन मुलाने कट करणारे मुलांच्यातील एका अल्पवयीन मुलास सुमारे १ महीण्यापुर्वी मारले होते याचा राग मनात धरुन दि.२५ रोजी
१० वीच्या परिक्षेचा शेवटचा पेपर संपल्यानंतर वेळे येथील अल्पवयीन मुलाला उचलून न्यायचे व कोयत्याने त्याच्यावर वार करुन त्याचा खुन करायचा असा कट रचला असल्याचे मान्य केले असून कट रचणारे अल्पवयीन मुलाकडून खुन करणे करीता वापरण्यात येणारा कोयता हस्तगत केला आहे. त्यानंतर सदर १ आरोपी व ४ विधीसंषर्धग्रस्त बालकांच्या विरोधात वाई पोलीस स्टेशनला भादविस कलम ११५,१२०(अ)(ब),३४ शस्त्र अधिनियम ४, २५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून गुन्हयाचा पुढील तपास आशिष कांबळे, सपोनी हे करीत आहेत. या कारवाई मध्ये बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन, आशिष कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी विजय शिर्के, सोनाली माने, पो. कॉ. किरण निंबाळकर, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर, अमित गोळे यांनी सहभाग घेतला.