बारामती ! एकीकडे नवीन वर्षाची गुढी उतरवण्याची वेळ असताना....सोमेश्वर कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी कामगार..कारखान्याकडे धाव घेतात....कारण कारखान्याचा सव्वा कोटींचा बगॅस पेटला होता

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा तब्बल १ कोटी ३५ लाख रुपये किंमतीचा साडेचार हजार टन बगॅसला आज सायंकाळी आग लागली. मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कारखान्याचे तब्बल सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
          पुढील हंगामासाठी कारखान्याने प्राथमिक शाळा सोमेश्वरनगर या ठिकाणी साडेतीन हजार बगॅस ठेवला होता. आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या बगॅसला अचानक आग लागली. कारखान्याच्या अग्निशामक बंबाने ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न निष्फळ ठरले. दरम्यान नीरा पोलिकेम येथील अग्निशामक बंबला प्रचारणा करण्यात आली. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने ही आग आटोक्यात आली नाही. त्यात आज सुटलेल्या वाऱ्यामुळे बगॅस ने लवकर पेट घेतला.साडेपाच वाजता लागलेल्या आग रात्री उशिरापर्यंत विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संचालक राजवर्धन शिंदे, लक्ष्मण गोफणे, ऋषी गायकवाड सर्व अधिकारी वर्ग तसेच कामगार पाणी घटनास्थळी धाव घेतली आहे.
To Top