सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
जुन्या बांधलेल्या गाईगोठ्याचे मस्टर काढण्याच्या कारणावर नारोळी येथील महिला ग्रामसेविका यांना दमदाटी करत विनयभंग केल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
दत्तात्रय मारुती ढमे रा नारोळी ता बारामती असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मारुती ढमे याने जुन्या बांधलेल्या गाईगोठयाचे मस्टर काढणेचे कारणावरून फिर्यादी ग्रामसेविकेस दमदाटी करून तसेच फिर्यादी हया सरकारी काम करीत असताना फिर्यादीचे ऑफिसचे दप्तर ओढुन फिर्यादीस सरकारी काम करून दिले नाही. म्हणुन फिर्यादी हया ऑफिसचे बाहेर आल्या असता आरोपी याने मागुन येवुन फिर्यादीचा उजवा हात पकडुन ओढुन फिर्यादीचे मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तेथुन निघुन गेला आहे. पुढील तपास प्रभारी अधिकारी सपोनि सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई शेख करीत आहेत.