बारामती ! वाघळवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी सतीश सकुंडे तर उपाध्यक्षपदी मनोज गायकवाड बिनविरोध

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पदे पार पडली या सोसायटीवर सतीश सकुंडे यांच्या गटाचे सर्वच्या सर्व ११ संचालक बिनविरोधपणे निवडून आले.
       नुकताच रोजी चेअरमन व व्हा चेअरमन निवडीचा कार्यक्रम पार पडला चेअरमन पदी सतीश सकुंडे व व्हा चेअरमनपदी मनोज गायकवाड यांची निवड करण्यात आली. चेअरमनपदी निवड झाल्यानंतर सोसायटी अडचणीत असून सोसायटी कर्जमुक्त करण्यासाठी, मध्यम मुदत कर्ज चालू करणे या साठी विरोधी पक्षनेते अजित दादा पवार व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, पुणे जिल्हा बँकेचे संचालक संभाजीनाना होळकर यांना भेटून सोसायटीसाठी मदत करण्याच्या मागणी करण्यात येईल.
     निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. धायतोंडे यांनी कामकाज पाहिले. निवडणूक कामात सोसायटीचे सचिव लकडे यांनी सहकार्य केले. यावेळी नवी मुंबई राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष श्री. विजय सावंत,  वाघळवाडी गावचे उपसरपंच गणेश जाधव, युवा नेते व ग्रामपंचायत सदस्य तुषार सकुंडे, नवनिर्वाचित संचालक दिगंबर जाधव, विजय गायकवाड, हिंदुराव सकुंडे, गोरख सावंत, रामचंद्र गायकवाड, सुभाष पवार,अजित भुजबळ, रेखा गायकवाड, शालन भोसले , युवा कार्यकर्ते सागर जाधव उपस्थित होते
To Top