सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर शहरातील नवी आळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मागील बाजूस दि.२४ रात्रीच्यावेळी काही तरुण नशा करून धुडगूस घालत असल्याचे स्थानिक नागरिकांनी भोर पोलिसांना तक्रार दिली.
या माहितीनुसार भोर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून सार्वजनिक ठिकाणी नशा करून गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवीत समज दिली. पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित तरुणांना मुंबई पोलीस अधिनियम १९५१ (११०/११२) अन्वये समज देऊन सोडून दिल्याचे ठाणे अंमलदार राहुल मखरे यांनी सांगितले.मात्र या ठिकाणी सातत्याने काही तरुण नशेचे पदार्थ सेवन करत असतात तर अनेक जणांचे ये-जा असून बेकायदेशीर धंदे करीत आहेत पोलिसांनी शहरात अशा होणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करू नये असे स्थानिकांचे म्हणणे आहे.यावेळी पोलीस हवालदार शिंदे,पिसाळ तसेच होमगार्ड घोरपडे,रणखांबे उपस्थित होते.