बारामती ! डोळे असूनही अंध झालेल्यांना जागे करण्याचे काम करायचे आहे : जाई खामकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
डॉक्टरांच्या चुकीमुळे अंधत्व आले, पण खचले नाही, डोळे होते तेंव्हा दिसत नव्हते. डोळे गेल्यावर रोज नवनवीन दिसायला लागले. त्यामुळे डोळे असूनही अंध झालेल्यांना जागे करण्याचे काम मला करायचे असल्याचे मत शिरूर येथील मळगंगा अंध व अपंग महाविद्यालयाच्या संस्थापिका जाई खामकर यांनी व्यक्त केले. 
       सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील महिलांचा गुणगौरव समारंभ पवार व जाई खामकर यांच्या हस्ते आयोजित केला होता. याप्रसंगी बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, आनंदकुमार होळकर, कार्य़कारी संचालक राजेंद्र यादव, शिवाजीराजे निंबाळकर, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर, जितेंद्र निगडे, संचालिका कमल पवार, रोहिणी जगताप, छाया भगत, संगीता कामथे, श्वेता गायकवाड, डॉ. मनोज खोमणे, भारत खोमणे, अशोक गाढवे उपस्थित होते. तनुजा शहा, मनिषा गाढवे यांनी मनोगत मांडले.
         शिरूर येथील मळगंगा अंध व अपंग संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा जाई खामकर म्हणाल्या, बारावीत असताना डॉक्टरांच्या चुकीमुळे अंधत्व आले. पण खचले नाही, प्रत्येक दिव्यांग व्यक्ती आत्मनिर्भर बनविणे माझे ध्येय आहे. डोळे असूनही अंध झालेल्यांना जागे करण्याचे काम मला  करायचे आहे. डोळे होते तेंव्हा दिसत नव्हते. डोळे गेल्यावर रोज नवनवीन दिसायला लागले आहे असे सांगत 
आज शिरूर येथे उभे केलेले अंध व अपंग महाविद्यालयात यात  ७२ अंध आणि अपंग मुले मुली शिक्षण घेत असून देशातील हे पहिले महाविद्यालयात आहे. अंध अपंगांना वंचित ठेवत असेल तर आमच्याकडे पाठवा असे आवाहन देखील खामकर यांनी केले.
प्रास्ताविक उपाध्यक्षा प्रणिता खोमणे यांनी केले. सूत्रसंचालन नितीन यादव व प्रा. रोहिणी घारे यांनी केले. किशोरी काकडे यांनी आभार मानले.  
--------------

To Top