सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती ! अशी भरारी घ्या की, समाजाने आपल्यावर गर्व केला पाहिजे : सुनेत्रा पवार

सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुरुष व स्त्री हे वेगवेगळे नाहीत तर उलट अनुरूप आहेत. त्यामुळे कुणीही कुणाला कमी लेखू नये. महापुरुषांच्या प्रयत्नांमुळे स्त्री शिकली, सक्षम झाली. राष्ट्रपती, पंतप्रधानही झाली. तुलनेत स्त्रीवर निसर्गतःच जास्त जबाबदारी आहे. ती पुढची पिढी घडविन्याचं सर्वात महत्त्वाचे करते. त्यामुळे अशी भरारी घ्या समाजाने आपल्यावर गर्व केला पाहिजे असे प्रतिपादन बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. 
          सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील महिलांचा गुणगौरव समारंभ पवार व जाई खामकर यांच्या हस्ते आयोजित केला होता. याप्रसंगी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, आनंदकुमार होळकर, कार्य़कारी संचालक राजेंद्र यादव, शिवाजीराजे निंबाळकर, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर, जितेंद्र निगडे,   
संचालिका कमल पवार, रोहिणी जगताप, छाया भगत, संगीता कामथे, श्वेता गायकवाड, डॉ. मनोज खोमणे, भारत खोमणे, अशोक गाढवे उपस्थित होते. तनुजा शहा, मनिषा गाढवे यांनी मनोगत मांडले.
         शिरूर येथील मळगंगा अंध व अपंग संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा जाई खामकर म्हणाल्या, बारावीत असताना डॉक्टरांच्या चुकीमुळे अंधत्व आले. पण खचले नाही, प्रत्येक दिव्यांग व्यक्ती आत्मनिर्भर बनविणे माझे ध्येय आहे. डोळे असूनही अंध झालेल्यांना जागे करण्याचे काम मला  करायचे आहे. डोळे होते तेंव्हा दिसत नव्हते. डोळे गेल्यावर रोज नवनवीन दिसायला लागले आहे असे सांगत 
आज शिरूर येथे उभे केलेले अंध व अपंग महाविद्यालयात यात  ७२ अंध आणि अपंग मुले मुली शिक्षण घेत असून देशातील हे पहिले महाविद्यालयात आहे. अंध अपंगांना वंचित ठेवत असेल तर आमच्याकडे पाठवा असे आवाहन देखील खामकर यांनी केले.
प्रास्ताविक उपाध्यक्षा प्रणिता खोमणे यांनी केले. सूत्रसंचालन नितीन यादव व प्रा. रोहिणी घारे यांनी केले. किशोरी काकडे यांनी आभार मानले.  
-------------------
शेतकरी महिलांचा सन्मान
स्वतःला अंधत्व आलेले असतानाही समाजातील अंध व दिव्यांगांसाठी भारतातील पहिले महाविद्यालय सुरू केलेल्या शिरूर येथील जाई खामकर, महाराष्ट्रातील पहिल्या एसटीचालक शीतल इथापे, सामाजिक कार्यकर्त्या तनुजा शहा, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, माळेगाव नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मीता काळे यांचाही सोमेश्वर कारखान्याने विशेष सन्मान केला. दरम्यान, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या दहा गटांमधील प्रत्येकी तीन महिलांचा आदर्श शेतकरी पुरस्काराने गौरव केला. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळातील महिला शिक्षिका, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस, होळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला कर्मचारी व साखर कामगार महिलांचाही गौरव करण्यात आला.
------------- 

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7207,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती ! अशी भरारी घ्या की, समाजाने आपल्यावर गर्व केला पाहिजे : सुनेत्रा पवार
बारामती ! अशी भरारी घ्या की, समाजाने आपल्यावर गर्व केला पाहिजे : सुनेत्रा पवार
https://lh3.googleusercontent.com/-sa2LbuCi0XI/ZAstz8A6hqI/AAAAAAAAVno/zRv-ALHIGxoSsHvyBfWn6opKmX2LiI2lQCNcBGAsYHQ/s1600/1678454220822999-0.png
https://lh3.googleusercontent.com/-sa2LbuCi0XI/ZAstz8A6hqI/AAAAAAAAVno/zRv-ALHIGxoSsHvyBfWn6opKmX2LiI2lQCNcBGAsYHQ/s72-c/1678454220822999-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/03/blog-post_83.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/03/blog-post_83.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy