सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर-मांढरदेवी ता.भोर मार्गावरील आदिशक्ती ढाब्याच्या समोर तीन ते चार कुत्र्यांनी बुधवार दि.८ सायंकाळच्या वेळी भेकराच्या पिल्लाचा पाठलाग करून हल्ला करीत असल्याचे शेजारील हनुमंत म्हस्के,शिक्षक हरिप्रसाद सवणे,मेजर राजेंद्र सातपुते तसेच सचिन कुडले यांनी पाहिले. तरुणांनी अथक प्रयत्न करून कुत्र्यांना बाजूला हटकून भेकराच्या पिल्लाला जीवदान दिले.
अन्न ,पाण्याच्या शोधामध्ये जंगलातून भेकराचे पिल्लू वाहतुकीच्या रस्त्याच्या बाजूला आले असता कुत्र्यांनी पाठलाग करून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.मात्र या चार तरुणांनी समोरील घडणारी घटना पाहताच बेकरांच्या पिल्लाला वाचवले तर त्वरित वनरक्षक पांडुरंग गुट्टे, वन कर्मचारी राहुल चव्हाण, राम चव्हाण यांना माहिती देऊन पिल्लाला त्यांच्या ताब्यात दिले.वनरक्षक गुठ्ठे यांनी भेकराच्या पिल्लाला भाबवडी येथील वनक्षेत्रात सुखरूप सोडून दिले.
COMMENTS