भोर ! महिला दिनानिमित्त विविध उपक्रम : कर्तुत्ववान महिलांचा सन्मान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------- 
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.बहुतांशी ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला गेला.
    भोर शहरात उन्नती महिला प्रतिष्ठान, तनिष्का व्यासपीठ व मराठा महासंघ भोर यांच्या वतीने विविध स्पर्धा घेवून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण केले.तर ५० हून अधिक भोर व वेल्हा तालुक्यातील कर्तुत्ववान महिलांना पुरस्कार देऊन सन्मानीत केले.भोलावडे येथे बँक ऑफ बडोदा आणि पंचायत समिती एमएसआरएलएम यांच्या संयुक्त विद्यमाने ४३ महिला बचत गटांना व ४३० महिलांना छोट्या व्यवसायासाठी २ करोड अर्थसाह्य दिले गेले. त्याबरोबरच राजा रघुनाथराव विद्यालयात विद्यालयात मुलींसाठी व्याख्यान आयोजित केले होते.नेरे येथे महिला ग्रामसभेचे आयोजन करून पाण्याचा योग्य वापर करणे व बचत गटांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे यावर चर्चा करण्यात आली. तर आर्ट ऑफ लिविंग संस्थेतर्फे अनंतराव थोपटे महाविद्यालय येथे शारीरिक स्वास्थ्य व मानसिक आरोग्य  कसे सांभाळावे यासाठी शेकडो महिलांना मार्गदर्शन केले गेले.यावेळी नगराध्यक्ष निर्मला आवारे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सीमा तनपुरे,पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, माजी नगरसेवक निसार नालबंद,किसन वीर,माजी उपसभापती लक्ष्मण पारठे,रेश्मा परब, ग्रामसेवक जालिंदर तळेकर, सरपंच उज्वला बढे,प्रा.संजय कडू,निलेश कुंभार उपस्थित होते.
विशेष सन्मान
    उन्नती महिला प्रतिष्ठानच्या वतीने भोर तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिला सुप्रिया धुमाळ हिने पोलीस खात्यात कर्तव्य बजावत असताना राज्यातील एकमेव डॉग प्रशिक्षक म्हणून काम पाहिल्याने विशेष सन्मान करून कर्तुत्वान महिला पुरस्कार देण्यात आला.

To Top