सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल सीबीएसई, वागळवाडी येथे आज वार्षिक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी इयत्ता नर्सरी ते दहावीच्या वर्गातील विविध शालेय उपक्रमांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली. शाळेतील पालक शिक्षक संघाच्या सदस्यांच्या हस्ते बक्षीस वितरण केल्याने पालकांनाही या कार्यक्रमात विद्यार्थ्यांबरोबर प्रत्यक्ष सहभागाची संधी मिळाली.
यावेळी शाळेचे प्राचार्य सचिन पाठक यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शनही केले या कार्यक्रमाचे नियोजन व संचलन शाळेतील बक्षीस वितरण विभाग प्रमुख स्वाती धुमाळ, रेश्मा गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडले.