सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर-वाघळवाडी येथील सोमेश्वर पॅलेस मंगल कार्यालय संध्याकाळच्या लग्नासाठी वापरण्यात येणारे गार्डन काढून टाकण्यात येणार असून त्याठीकाणी अक्षय शिंदे फाउंडेशन व आर एन शिंदे चॅरिटेबल ट्रस्टची भव्य इमारत उभी राहणार आहे. यामध्ये गोरगरीबांसाठी मदत केंद्र उभारण्यात येणार असून असे मदत केंद्र उभारणारे अक्षय शिंदे फाउंडेशन हे राज्यात एकमेक असणार आहे.
ही इमारत चार मजली असून यामध्ये तळघरामध्ये पार्किंग व कँटीन दुसऱ्या मजल्यावर अक्षय शिंदे फाउंडेशन व आर एन शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट ची कार्यालय राहणार असून तर इतर इमारतीत गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असणार आहेत. तर इमारतीपुढे भव्यदिव्य असे बागबगीचा उभारण्यात येणार आहे. गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत तसेच गोरगरीबांना अन्नदान हा मूळ उद्देश असल्याचे आर एन शिंदे यांनी सांगितले. लवकरच या इमारतीचे काम सुरू होणार असून तीन वर्षात ही इमारत उभी राहणार आहे. नुकत्याच या कामाचा भूमिपूजन शुभारंभ पार पडला.
यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, उद्योजक आर एन शिंदे, ऊस वाहतूक वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे, युवानेते गौतम काकडे, मुरूमचे माजी सरपंच अजित जगताप, आशालता शिंदे, संजय शिंदे, दत्तात्रय शिंदे, नानासाहेब मदने, गणेश शिंदे, फाउंडेशनचे सदस्य संतोष शेंडकर, महेश जगताप, योगेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते.