बारामती ! अंजनगावच्या सरपंचपदी प्रतिभा परकाळे दुसऱ्यांदा बिनविरोध

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 
माळेगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील अंजनगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी दुसऱ्यांदा प्रतिभा दिलीपराव परकाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यापूर्वी प्रतिभा परकाळे यांनी २००५ ते २००९ या साली अंजनगावच्या सरपंचपदाची सूत्रे सांभाळली होती. तर त्यांचेच पती दिलीप परकाळे यांनी २०१५ ते २०१८ मध्ये सरपंचपदाची धुरा सांभाळली होती. आज पुन्हा तिसऱ्यांदा दिलीप परकाळे यांच्या पत्नी सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र परकाळे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सरपंचपदाची हॅट्रिक केली आहे. 
             ग्रामपंचायत चे सरपंच सविता परकाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदी प्रतिभा परकाळे यांची बिनविरोध निवड पार पडली. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब परकाळे, माजी संचालक दादासाहेब मोरे, माजी सरपंच दिलीप परकाळे, उद्योजक सुरेश परकाळे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष परकाळे, उपसरपंच सुभाष वायसे, विलास परकाळे, मिलिंद मोरे यांचेसह सर्व सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुळे व ग्रामसेवक मुलाणी यांनी काम पाहिले.
To Top