सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
जुबिलंट इंग्रेव्हिया लि. ,जुबिलंट भारतीया फाऊंडेशन आणि दामिनी ग्रामसंघ यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त निरा येथे महिला बचत गट महोत्सव व फूड फेस्टिव्हलचे निरा सिटी सेंटर येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या फूड फेस्टिव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जुबिलंट भारतीया फाऊंडेशन तर्फे दरवर्षी निरा-निंबुत परिसरातील महिलांना सक्षम करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये त्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देखील दिले जाते. त्याचबरोबर महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून प्रयत्नही केले जातात. या फूड फेस्टीव्हलमध्ये महिलांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची विक्री करण्यात आली. या फूड फेस्टीव्हलमध्ये निरा-निंबुत येथील महिला बचत गटांचे 40 स्टॉल्स सहभागी झाले होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठ सोशियल सायन्स सेंटर,पुणेच्या संचालिका डॉ.अनिता मोहिते,स्पंदन संस्थेच्या सल्लागार व मानसशास्त्रज्ञ दिपा राक्षे आणि पंचायत समिती,पुरंदरच्या तालुका अभियान व्यवस्थापक नंदा कुरडे उपस्थित होते.याबरोबरच निराचे उपसरपंच राजेशभाऊ काकडे,निरा सदस्य अनिल चव्हाण, जुबिलंट इंग्रेव्हिया लि.चे उपाध्यक्ष सतीश भट ,कॉर्पोरेट अफेअर्सचे हेड जी.के.रमण आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जुबिलंट भारतीय फाउंडेशन तर्फे अजय ढगे,जुबिलंट इंग्रेव्हिया लि.मधील वरिष्ठ अधिकारी राजेंद्र राघव,निशांत फड,सुर्यकांत पाटील,युवराज काळे,डॉ.प्रतिक पटेल,संगीता जाधव,जुबिलंट कामगार युनियन उपाध्यक्ष सुरेश कोरडे,तसेच युनियनचे सर्व पदाधिकारी,निरा व निंबूत मधील सर्व मान्यवर व महिला उपस्थित होत्या,अशी माहिती ज्युबिलंट इंग्रेव्हिया लि.चे जनसंपर्क व्यवस्थापक इसाक मुजावर यांनी दिली.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि स्टॉलधारकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.जुबिलंट इंग्रेव्हिया लि.चे उपाध्यक्ष सतीश भट आणि कॉर्पोरेट अफेअर्सचे हेड जी.के.रमण यांनी जुबिलंट इंग्रेव्हिया लि.व जुबिलंट भारतीया फाऊंडेशन हे सदैव महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
खाद्य क्षेत्राशिवाय जुबिलंट भारतीया फाऊंडेशन तर्फे महिला सक्षमीकरणासाठी इतर क्षेत्रात देखील प्रशिक्षण दिले जाते .या कार्यक्रमाच्या आयोजन समितीमध्ये जया काळे,तनुजा शहा,राधा माने,संगीता जगताप ,सायली फुंडे,सुनिता भादेकर,निकिता महामुनी,सविता दुर्वे यांचा सहभाग होता.