पुरंदर ! विजय लकडे ! निरेचा श्वास गुदमरतोय.... काही व्यवसायीकांचे फुटपाथवर ...! तर बेशिस्त वाहनचालकांचे निम्म्या रस्त्यावर अतिक्रमण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नीरेत बुवासाहेब चौक ते ग्रामपंचायत कार्यालय  व तेथून पुढे एसटी स्टँड पर्यंत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोठमोठ्या व्यापारी दुकानांची बाजारपेठ आहे. नीरा शहर हे मध्यवर्ती ठिकाण व मोठी बाजारपेठ असल्याने आजूबाजूच्या गावातील किरकोळ दुकानदार खरेदी करण्यासाठी येत असतात तसेच शेतकरी आपला तरकारी माल विक्रीसाठी घेऊन येतात तसेच शाळा व कॉलेजमधील मुले व मुली शिक्षणासाठी भरपूर प्रमाणात निरेवर अवलंबून आहेत यामुळे मुख्य बाजारपेठेत कायम वर्दळ असते.    
            परंतु येथील व्यवसायिकांनी आपल्या दुकानाच्या पाट्या फुटपाथवर लावलेल्या आहेत काही व्यवसायिकांनी फुटपाथपर्यंत अतिक्रमण केलेले आहे तसेच दुकानातील काही मालांची पोती फुटपाथवर आणून ठेवतात त्यामुळे फुटपाथवर चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिक शाळा कॉलेजमधील मुले व मुली व विशेषता महिला वर्गाला याचा नाहक त्रास होतो. रस्त्यावर कायम वाहतुकीची वर्दळ असल्याकारणाने नागरिकांनी कोठून जायचे असा प्रश्न जेष्ठ नागरिक विचारत आहेत.
                  ग्रामपंचायत निरा व पोलीस प्रशासन यांनी समन्वय साधून सदर अतिक्रमणे काढून लोकांना मुक्तपणे संचार करण्यास मिळावा अशी नागरिकांना नागरिकांकडून मागणी होत आहे.
To Top