सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चवदार तळ्यावर पाण्यासाठी सत्याग्रह करुण मानवी हक्क व अधिकारांसाठी समानतेचा लढा केला हा दिवस महाड चवदार तळे येथे क्रांतीदिन म्हणून साजरा करण्यात येतो. संपूर्ण देशातून महाड चवदार तळे येथे जाण्यासाठी भोर-महाड मार्गे हजारो भीम अनुयायी येतात. प्रवासा दरम्यान जेवण व पाणी मिळावे गैरसोय होऊ नये म्हणून सामाजिक बांधीलकी जपत हिरडस-मावळ खोऱ्यातील निगुडघर ता.भोर येथे २० मार्च क्रांतीदिनाचे औचित्य साधून बौद्धजन संघ भोर तालुकाच्या वतीने मोफत अन्न व पाणी वाटप करण्यात आले.
यावेळी भोर तालुक्यातील आंबेडकरी युवा तर्फे भोर शहरातील एसटी स्टँड जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,आहील्यामाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भोर ते निगुडघर निळे झेंडे घेऊन "जय भीम" च्या घोषणा देत मोटार सायकल रॅली काढण्यात आली.यामध्ये शेकडो तरुणांनी सहभाग नोंदवला त्यानंतर आपटी ता.भोर येथिल दिवंगत खा.बाळासाहेब साळुंखे यांच्या स्तंभाला मानवंदना दिली. त्यानंतर निगुडघर येथे सर्व अनुयायी एकत्र आले.यावेळी खा.बाळासाहेब साळुंखे प्रतिष्ठानचे अध्यक्ष कश्यप साळुंखे व पत्रकार संघ भोरचे पत्रकार रुपेश जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालून व मेणबत्ती लावून कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.भारतीय बौद्ध महासभा शाखा भोर तालुकाचे अध्यक्ष रामचंद्र रणखांबे, उपाध्यक्ष शंकर भालेराव, अविनाश गायकवाड, बौद्धजन संघ भोरचे अध्यक्ष महेंद्र सपकाळ, अनिल गायकवाड, विजय ओव्हाळ, सचिन गायकवाड, सुनील मोरे, आनंदा सातपुते, अविनाश गायकवाड, हनुमंत गायकवाड, गणेश साळुंखे आदींसह उपस्थित होते.