सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लाखेवाडी : प्रतिनिधी
जय भवानी गड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी मध्ये स्त्रियांना स्त्री शिक्षणाचा अधिकार मिळवून देणाऱ्या ,स्वावलंबी, सक्षम बनवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .
विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान,पैशाची देवाण-घेवाण ,नफा -तोटा ,बोलण्याचे कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी विद्यालयामध्ये 'मार्केट डे' चे आयोजन करण्यात आले होते . इयत्ता 1ली ते 11वीच्या विद्यार्थ्यांनी भाजी मंडई, खाऊचे स्टोल, मजेशीर खेळ, किराणा साहित्य, कटलरी साहित्य यांचे 420.स्टोल्स लावण्यात आले होते .अतिशय चांगल्या पध्दतीने विद्यार्थी, पालक ,शिक्षक खरेदी करत होते .मालाची खरेदी- विक्री केली. आपले साहित्य कशाप्रकारे चांगले आहे हे विद्यार्थी पटवून सांगत होते. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह,आनंद दिसून आला.
यावेळी जय भवानीगड विकास प्रतिष्ठान,लाखेवाडी संस्थेचे अध्यक्ष मा.सदस्य जि.प.पुणे श्रीमंत ढोले सर,संस्थेच्या उपाध्यक्षा व लाखेवाडीगावच्या विद्यमान सरपंच सौ. चित्रलेखा ढोले मॅडम,संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे सर,संस्थेचे प्रमुख सल्लागार माननीय प्रदीप गुरव सर,संस्थेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पवार सर,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य मा. सम्राट खेडकर सर सर्व सुरवायझर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, पालक,विद्यार्थी,यांच्या उपस्थितीत ' मार्केट डे ' साजरा करण्यात आला.