सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे एस्टी बसस्थानक नजीक असलेल्या टाटा इंडीकॅश कंपनीच्या एटीएम मधील एटीएम मशीनसह सुमारे ८ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल घेवुन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला असल्याची घटना शुक्रवारी ( दि. १० ) पहाटे घडली असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यामुळे चोरीचे फुटेज घेवुन योग्य दिशेने तपास सुरु असल्याची माहीती पोलीसांनी दिली आहे.
येथील एटीएम मशीन गॅस कटरने कापुन एटीएम मशीनसह अज्ञात चोरट्यांनी बोलोरो या चार चाकी वाहनात टाकुन उंडवडीच्या दिशेन पोबारा केला. यावेळी नारोळी गावानजीक एटीम मशीनचा काही भाग टाकुन दिल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी उंडवडीवरुन रावणगाव बोरीबेल रस्त्यावरील घाटात असलेल्या गटरात एटीएम मशीन लपविण्याचा प्रकार केला. मात्र पहाटेच्या वेळी व्यायामासाठी आलेल्या तरुण मुलांनी चोरट्यांचा डाव उधळुन लावला.
रावणगाव येथील तरुण कार्यकर्ते बाळदत्त आटोळे, कुमार चव्हाण, गणेश गावडे यांच्या सतर्कतेमुळे चोरी उघडकिस आली. या कार्यकर्त्यांमुळे चोरट्यांचा घाटात एम एच १२ अशी पासींग असणारी बोलोरो मधुन एटीएम मशीन काढुन गटरात लपवण्याचा डाव फसला. तसेच चोरट्यांनी तरुणाना पहाताच धुम ठोकली.
त्यानंतर रावगाव येथील कार्यकर्त्यांनी दौंड पोलिसांना माहिती देताच पोलिस निरिक्षक भाऊसाहेब पाटील, पोलिस हवालदार पांडुरंग थोरात, गोरख मलगुंडे आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एटीएम मशीन ताब्यात घेवुन हा प्रकार सुपे येथील घडला असल्याचे सांगण्यात आले.
सुपे येथील घटनास्थळी विभागिय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, वडगाव निंबाळकरचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन काळे यांनी भेट दिली असुन दौंड पोलुसांकडुन एटीएम मशीन ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भातील फिर्याद मयुर बापुराव कोकरे ( रा. पणदरे, धुमाळवाडी ता. बारमती ) यांनी पोलिस स्टेशनला दिली आहे. येथील एटीएम मध्यरात्रीला सुमारे २ वाजुन ३४ मि. नी चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसुन येत आहे. या मशीनचा काही भाग नारोळीत टाकुन दिला. तर उरलेले एटीएम मशीन रावणगाव नजीकच्या घाटात लपवण्याचा प्रकार करीत असताना उघडकीस आला. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी मशीन सोडुन धुम ठोकली. रावणगाव येथील तरुण कार्यकर्त्यांमुळे या चोरीचा पर्दाफाश झाला.
त्यामुळे एटीएम मशीनसह चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करुन सुपे पोलिसांच्या ताब्यात आला आहे. तर उद्या ( शनिवारी ) दौंड पोलिसांच्या समक्ष पंचनामा करुन त्यातील रक्कम पाहण्यात येणार असल्याची माहिती सुप्याचे पोलिस उपनिरिक्षक सलिम शेख यांनी दिली.
अधिक तपास सुपे येथील पोलिस उपनिरिक्षक सलीम शेख करीत आहेत.
.............................
COMMENTS