बारामती ! सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर उत्साहात संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने मौजे देऊळवाडी (करंजे) ता. बारामती येथे दि २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते.
           या शिबिरादरम्यान पन्नास विद्यार्थ्यांनी सलग सात दिवस देऊळवाडी येथे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास व्हावा या उद्देशाने विविध उपक्रम राबविले. या शिबिराची उद्घाटन संस्थेचे चीफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व मा.व्हा.चेअरमन  आनंदकुमार होळकर यांनी केले. विद्यार्थ्यांचा बोधात्मक,भावात्मक व शरीरात्मक विकास करण्याचे काम रा से यो  करते असे प्रतिपादन त्यांनी यावेळेस केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. धनंजय बनसोडे,  श्री बाळासाहेब भांडवलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
            या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विविध सामाजिक व विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासाचे उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये व्यायाम योगासने, परीपाठ, वृक्षारोपण, ग्राम स्वच्छता, तीर्थक्षेत्र स्वच्छता, रस्ते सफाई , सार्वजनिक जागा सुशोभीकरण, सलग सम पातळी चर खोदणे , वृक्ष संवर्धन, जि. प. शाळा देऊळवाडी येथील स्वच्छता व शाळेतील मुलांना स्वच्छतेचे धडे देणे,  याच ठिकाणी स्वयंसेवकांनी अनोखी मेंहदी स्पर्धा घेतली,   यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातावर स्वयंसेवकांनी मेहंदी काढून त्यांची वैयक्तिक माहितीचा एकत्रित अहवाल करून त्याचे सादरीकरण केले,  गटामध्ये वक्तृत्व स्पर्धा,  पोस्टर्स स्पर्धा , संत गाडगेबाबा यांची १४७ वी जयंती साजरी करणे,  "स्वच्छ भारत सुंदर भारत" या विषयावर मंदिर परिसर व लोकवस्तीच्या ठिकाणी पथनाट्य सादर करणे,   महिला सबलीकरण अंतर्गत  रा.से.यो चा माजी स्वयंसेवक श्री. विक्रम धायगुडे धन्वंतरी लॅब खंडाळा व रा.से.यो. विभाग यांच्या संयुक्तपणे परिसरातील महिलांसाठी "मोफत रक्त तपासणी"  उपक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वयंसेवकांनी स्वच्छता पर जनजागृती रॅली चे आयोजन केले , यादरम्यान स्वयंसेवकासाठी अनंथा व पुनम उदमले यांचा "अभंगवाणी" चा कार्यक्रम आयोजित केला होता. रा.से.यो माजी स्वयंसेवक कवी अझहर नदाफ,  शुभम काकडे संचिता गार्डे व सहभागी स्वयंसेवकांनी शिबिरात आयोजित "काव्यसंमेलन" मध्ये स्वरचित कविता सादर केल्या, सौ. अनिता जाधव ट्रेनर फॅक्ट शाळा कार्यशाळा यांनी सायबर सेक्युरिटी या विषयावर कार्यशाळा आयोजित केली,  सोमेश्वर परिसरातील पत्रकार बंधू गणेश आळंदीकर ,  दत्ता माळशिकारे ,  महेश जगताप ,  युवराज खोमणे यांनी "पत्रकारिता व समाज" या विषयाच्या चर्चासत्रामधून विद्यार्थ्यांशी विविध विषयावर संवाद साधला,  देऊळवाडी येथील ग्रामस्थांसाठी विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला यावेळेस श्री अनिकेत हुंबरे सुप्रसिद्ध गायक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,
        शिबिरा दरम्यान आयोजित व्याख्यानमालेत विविध विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती यामध्ये ऊर्जा संवर्धन व आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे कृषी क्षेत्रातील फायदे,  युवक व कविता,  युवक व राष्ट्रीय सेवा योजना , सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट काळाची गरज,  कोरोना नंतरची आव्हाने,  तरुणापुढील आव्हाने व समस्या या विषयांवर अनुक्रमे डॉ संजय देवकर प्राचार्य शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजि., सोमनाथ कदम,  प्रा. अमर नांदगुडे,  डॉ.संजय दीक्षित उपप्राचार्य मुधोजी महाविद्यालय फलटण ,  डॉ.संदीप बनकर, परेश जयश्री मनोहर यांनी मार्गदर्शन केले. 
         शिबिराला पुरुषोत्तम जगताप चेअरमन सोमेश्वर सह.सा.कारखाना लि. जितेंद्र निगडे सोमेश्वर सह.सा. का. लि. सचिन काळे ए.पी.आय पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकर ,  शरद गावडे उपप्राचार्य शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजि. यांनी सदिच्छा भेट दिली. 
  संस्थेचे चीफ एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आनंदकुमार  होळकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रमसंस्कार शिबिराचा समारोप झाला राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश निकाळजे , सर्व प्राध्यापक व स्वयंसेवक यांनी शिबिराचे नियोजन केले . संस्थेचे अध्यक्ष सचिव व सर्व संचालक यांनी शिबिरास शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.
To Top