बारामती ! करंजेपुल ग्रामपंचायती वतीने कष्टकरी महिलांसह यशस्वी उद्योजीका व बचत गट अध्यक्ष महिलांचा गौरव

Admin
2 minute read
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
बारामती तालुक्यातील करंजेपुल ग्रामपंचायतीतर्फे कष्टकरी महिलांचा ,बचत गट अध्यक्षांचा व यशस्वी उद्योजिका यांचा गौरव करीत महिला दिन साजरा करणेत आला . 
           पंचायत समिती सदस्या मेनकाताई मगर यांचे उपस्थितीत या महिलांचा सन्मान यावेळी करणेत आला. प्रास्ताविकामधे ग्रामसेविका सुजाता आगवणे यानी महिलाशक्ती एकत्र आल्यावर काय करु शकते हे सांगुन सर्वसामान्य महिलाना व्यासपीठ उपलबध करुन देणे ,कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करणे हा महिलादिन साजरा करणेचा उद्देश असलेचे सांगीतले .
      दोन बचत गटाद्वारे केलेल्या सामाजिक कार्याबद्दल व ए.जी. आळंदीकर सराफ पेढीद्वारे मिळवलेल्या यशाबद्दल  येथील अमरजा आळंदीकर ,संगीता आळंदीकर यांचा गौरव करणेत आला.तसेच महिला बचत गटाच्या अध्यक्षा अनिता शेलार ,शारदा शेंडकर, शमीका दगडे ,जाधव मॅडम ,संगीता निमाण ,रेखा गायकवाड ,सयोगीता धुर्वे ,रुपाली  चव्हाण ,मंगल जगताप ,आशा पाटोळे ,नयना पवार ,सोनाली गायकवाड,रेश्मा मगर ,नंदिनी गुळुंबे, ईत्यादी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करणेत आला . ऐश्वर्या आळंदीकर यानी महिलादिनाची पार्श्वभूमी व महत्व सांगीतले .
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार ग्रामसेविका सुजाता आगवणे यानी केले . बारामती तालुका पंचायत समिती चे बचत गट समन्वयक विनोद लांडगे यानी यावेळी बचत गटाच्या योजना ,विमा संरक्षण ई विषयावर माहीती दिली .
       स्त्री रोग तज्ञ डॉ. मोनाली जाधव   यांचे वतीने मोफत  आरोग्य तपासणी तसेच  हिमोग्लोबिन तपासणी करणेत आली .करंजेपुल येथे बचत गटाच्या माध्यमातून अनेक उद्योग उभे राहीले असुन सर्व महिला कौतुकास पात्र असलेचे यावेळी पंचायत समिती सदस्या मेनका मगर म्हणाल्या .
To Top