भोर ! वीसगावच्या गणोबा माळावरील गणेश मंदिराचा जिर्णोद्धार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील धावडी ता.भोर येथील गणोबाच्या माळावरील पुरातन काळातील श्री गणेश मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन पंचक्रोशीतील नागरिक तसेच ह.भ.प.पंडित महाराज नागरगोजे यांच्या हस्ते करण्यात आले.
     गणेश मंदिर हे वीसगाव खोऱ्यातील पंचक्रोशीच्या वेशीवर असून गणोबा माळावरील नवसाला पावणारे श्री गणपती बाप्पा  नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. दररोज गणोबा माळावरील शेकडो वर्षांपूर्वीच्या गणेश मूर्तीच्या दर्शनासाठी वरवडी -भोर मार्गावरून जाणारे-येणारे प्रवाशी(भाविक )दर्शन घेत असतात. गुरुवार दि. ९ ह.भ.प. पंडित महाराज नागरगोजे तसेच मिलिंद म्हसवडे यांच्या हस्ते मंदिराच्या पायाभरणीचे काम सुरू करण्यात आले.यावेळी पळसोशी,पाले ,धावडी, बाजारवाडी, वरवडी, अंबाडे ,बालवडी ,नेरे,हातनोशी,खानापूर  पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धावडी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात येणार आहे.

To Top