सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
औरंगाबाद येथुन कपडे खरेदीसाठी निघालेल्या व्यापाऱ्याला मोरगाव ता बारामती येथील शिवशंभो हॉटेल जवळ तिघांनी कोयत्याचा व चाकूचा धाक दखवत व्यापाऱ्यांकडील आठ लाख रुपयांची रोकड लुटली.
याबाबत मोहम्मद अब्दुल रहिम कुरेशी वय २७ वर्षे व्यवसाय. कापड दुकान रा. रमनासपुरा, शहागंज बनीमिया दर्गा,जि. औरंगाबाद यांनी वडगांव निंबाळकर पोलीसांच्या तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलीसांचनी तीन अज्ञानाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर हकीकत अशी, दि ३० रोजी पहाटे ५ वाजता यातील फिर्यादी हे लहान मुलांची कपडे घेण्यासाठी फिर्यादी यांचा कापड दुकान भागेदार फजल पटेल यांचेकडून ४ लाख रुपये व फिर्यादीचे ४ लाख रुपये असे मिळून रोख ८ लाख रूपये कॅश घेवुन सदरची रक्कम बुलेरो पिकअप गाडी नंबर एम एच २० डि.ई ६०५९ हिचे ड्रायव्हरचे सिट खाली पांढरे रंगाचे पिशवीत ठेवून फिर्यादी व ड्रायव्हर शेख इफ्तेकार असे रात्री साडेदहा वाजता औरंगाबाद येथून निघाले असता ते प्रवास करत मोरगाव निरा जाणारे रोडवर ता. बारामती जि.पुणे गावचे हददीत आले असता त्यांची पिकअप जीभला शिवशंभो ढाब्याजवळ तीन अज्ञात इसमानी त्यांचे ताब्यातील स्विप्ट डिझायर पांढरे रंगाची गाडी पिवळे रंगाची नंबर प्लेट व त्याचे पाठीमागील बंपर काळा पडलेला असलेल्या गाडीने फिर्यादीच्या ताब्यातील पिकअप नंबर एम एच २० डि.ई ६०५९ हिस आडवी गाडी मारून चाकुचा व कोयत्याचा धाक दाकवुन जबरी चोरी करून गाडीतील रोख रक्कम ८ लाख ७ हजार- रु व मोबाईल घेवून गेले आहेत.
पुढील तपास सपोनि सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउनि योगेश शेलार करत आहेत.
COMMENTS